कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखालील भव्य तिरंगा रॅली!

आमदार महेशदादा लांडगे, आमदार अमित गोरखे,शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांची उपस्थीती
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार संत तुकाराम नगर मध्ये (दि.१५) रोजी भव्य तिरंगा रॅली राष्ट्रीय श्रमिक आघाडी, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादितच्या वतीने राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. या रॅलीला भोसरी मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे, विधान परिषद आमदार अमित गोरखे,शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, सदाशिव खाडे, पक्षनेते प्रशांत शितोळे,अजीज भाई शेख आधी उपस्थित होते.

संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. रॅली पंचशील बुद्ध विहार मार्गे संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन, मैत्री चौक, जिरे टोपी चौक मार्गे , महेश नगर, डी वाय पाटील हॉस्पिटल ,वायसीएम हॉस्पिटल मार्गे आचार्य अत्रे सभागृह, वल्लभ नगर, हुतात्मा चौक मार्गे साईबाबा मंदिर, शनी मंदिर चौक मार्गे रॅलीचे श्रमिक आघाडीचे कार्यालय येथे सभेत रूपांतर झाले.
यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले की, देशभक्तीचा उत्साह आणि भारतमातेविषयीचे प्रेम व्यक्त करत कामगार नेते तथा भाजपाचे नेते यशवंतजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिकांनी हातात तिरंगा घेत रॅलीमध्ये सहभाग नोंदवला..रॅलीमध्ये विशेषतः महिलांचा सहभाग लक्षवेधी ठरला.
कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले की,देशाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने महिला, युवक, कामगार, श्रमिक आणि स्थानिक नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले, त्याग आणि बलिदानाची जाणीव तरुणांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने देशभर तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात आहे.
या तिरंगा रॅलीचे संयोजन मंडल अध्यक्ष मंगेशजी धाडगे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली थोरात, नंदू आप्पा कदम, किरण सुवर्ण,जयदेव अक्कलकोटे,मुन्ना बाविस्कर ,उद्योजक दीपक शेठ पाटील, दिनेश पाटील, राहुल शितोळे ,दत्ता गायकवाड, अमोल घोरपडे ,राहुल खाडे , संतोष दुबे, विजय दळवी, मनिष अमोलिक, प्रभजोत सिंगहंस आदींनी केले.

