Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd November 2026
गुन्हेगारी

दुचाकी मोटरसायकली चोरी करून विक्री केलेल्या 22 दुचाकी ताब्यात; तरुणास अटक!

दुचाकी मोटरसायकली चोरी करून विक्री केलेल्या 22 दुचाकी ताब्यात; तरुणास अटक!

गुन्हे शाखा युनिट एकची करवाई
पिंपरी : कमी वेळात जास्त पैसे कमविण्याच्या नादात सुशिक्षित तरुणाने दुचाकी मोटरसायकली चोरी करून विक्री केलेल्या 22 दुचाकी ताब्यात घेऊन गुन्हे उघड केले. सुमारे 12 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी दिली आहे.

viara vcc
viara vcc

सचिन पांडुरंग मरळे (वय 33, रा. मुक्काम पोस्ट रुई, ता. बारामती, सध्या- रा. ढोरे पाटील फार्म, भावसार यांच्या घरात भाडेकरू, जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्याआरोपीचे नाव आहे.

पिंपरी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळापासून आरोपी येण्याचे व जाण्याचे तब्बल अडीशे ते तीनशे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून फुटेज प्राप्त केले. आरोपी हा मुख्य रस्ता न वापरता वारंवार रस्ते बदलून आड मार्गाने चोरी करत होता. सचोटीने व सातत्याने फुटेजची पाहणी करून मिळालेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून आरोपी सचिन पांडुरंग मरळे यास निष्पन्न केले. बातमीदारा तर्फे माहिती काढून सापळा लावला असता त्यास पोलीस शोध घेत असल्याची माहिती मिळाली. आरोपीचा पाठलाग करून सीताफिने गुन्ह्यातील चोरी केलेल्या मोटरसायकल सह त्यास ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडे केलेल्या सखोल तपासामध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी एक ते दीड वर्षांपूर्वी इलेक्ट्रिशियन कोर्स करीत असताना ओळख झालेल्या व्यक्तींना बनावट कागदपत्रे बनवून बँकेच्या फायनान्सच्या दुचाकी ओढून आणलेल्या गाड्या असल्याची खोटे सांगून दुचाकी सांगोला ,अहिल्यानगर, शिरूर, बीड, रायगड जिल्ह्यातील व्यक्तींना विक्री केल्या होत्या असे तपासात निष्पन्न झाले . ज्या व्यक्तींनी या दुचाकी खरेदी केल्या त्यांच्यावर चोरीची मालमत्ता स्वीकारली म्हणून कारवाई करण्यात आली आहे. इतर दुचाकी आरोपीस खरेदीदार न मिळाल्याने त्याने लपवून ठेवलेल्या होत्या त्या हस्तगत करण्यात आल्या. आरोपी कडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या 22 महागड्या मोटरसायकली हस्तगत करून 22 गुन्हे उघड करण्यात आले आहेत .आरोपीने संत तुकाराम नगर, पिंपरी, चतु: शृंगी, हिंजवडी, सांगवी, दापोडी, शिरूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन दुचाकी गाड्यांची चोरी केली होती.

ही कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. सुदर्शन राठोड, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वेताळ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"