फक्त मुद्द्याचं!

19th May 2024
समाजकारण

महापालिकेतर्फे सक्तीने मिळकतकर वसुली!

महापालिकेतर्फे सक्तीने मिळकतकर वसुली!
  • PublishedMarch 23, 2024

नागरिकांमध्ये वाढला रोष: जप्तीच्या कारवाईने भीतीचे वातावरण

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कर संकलन आणि पाणी पट्टी एकत्र वसूल करण्याचा निर्णय यशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत महापालिकेच्या इतिहासातील प्रथमच ६३ कोटी रुपयांची पाणीपट्टी वसुली झाली आहे.१२८ कोटींची पाणी पट्टी थकीत आहे, २५० पेक्षा अधिक नळजोड खंडित केले आहेत, अशी माहिती कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा तीन लाख ६१हजार १३१ अधिकृत नळ जोडधारक आहेत. महापालिकेला पाणी पुरवठा विभागाकडून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसून थकबाकीही वाढत होती. एकीकडे मिळकत करातून दिवसेंदिवस उत्पन्न वाढत असताना पाणीपट्टी मात्र थकीत राहत असल्याने पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पाणीपट्टी वसुली ही कर आकारणी व कर संकलन विभागाकडे देण्यासाठी चाचपणी सुरू केली.

राज्यातील काही महापालिकांमध्ये पाणीपट्टी वसुली आणि कर वसुलीचे एकत्रित कामकाज चालते. त्या महापालिकांचा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अभ्यास केला. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. कर संकलन आणि पाणी पुरवठा विभागांमधील अधिकारी, मीटर निरीक्षकांच्या बैठका घेतल्या.

२५० पेक्षा अधिक नळजोड खंडित

महापालिकेच्या वतीने कर संकलन विभागाच्या वतीने कर वसुली जोरदार सुरू असतानाच आर्थिक वर्षात पाणी पट्टी वसुलीकडे आपला मोर्चा वळवला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आणि क्षमता असूनही पाणी पट्टी न भरणाऱ्या २५० पेक्षा जास्त मालमत्ता धारकांचे नळजोड खंडित करण्याची धडाका मीटर निरीक्षक आणि कर संकलन विभागाच्या पथकाने लावला आहे.

वसुलीसाठी मीटर निरीक्षक ‘ॲक्शन मोडवर’
कर संकलन आणि पाणी पट्टी एकत्र वसुल करण्याबाबत मीटर निरीक्षकांना सुरुवातीला काही प्रमाणात साशंकता होती. आता मात्र पाणी पट्टी वसुलीसाठी कर संकलन विभागाचे पथक, मीटर निरीक्षकांचे पथक आणि जोडीला एमएसएफ जवानांची मदत मिळत आहे.


आगामी आर्थिक वर्षांपासून बोगस नळजोड शोध मोहीम

आगामी आर्थिक वर्षांपासून पाणी पट्टी विभागाच्या सहकार्याने कर संकलन विभागाच्या वतीने
बोगस नळजोड शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. सध्या ३१ मार्चपर्यंत थकबाकीदारांचे नळजोड खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.
…..
१२८ कोटींची पाणी पट्टी थकीत

महापालिकेचे शहरात आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत . या आठही क्षेत्रात कार्यालया अंतर्गत चालू मागणी आणि जुनी अशी १२८ कोटी ३८ लाख ७४ हजार रुपयांची थकबाकी आहे.

….

कर संकलन विभागाचे उत्पन्न वाढत असताना पाणी पट्टीच वसूल होत नव्हती. त्यामुळे राज्यातील काही महापालिकेच्या कर संकलन आणि पाणी पट्टी एकत्र वसूल करण्याच्या निर्णयाचा सुक्ष्म पध्दतीने अभ्यास केला. त्यानुसार कर संकलन विभागाकडे मीटर निरीक्षक वर्ग करण्यात आले. त्याचे फलित म्हणूनपाणी पट्टी वसुलीचा आलेख वाढत आहे.
-प्रदीप जांभळे-पाटील
अतिरिक्त आयुक्त

१२८ कोटींची पाणी पट्टी थकीत

महापालिकेचे शहरात आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत . या आठही क्षेत्रात कार्यालया अंतर्गत चालू मागणी आणि जुनी अशी १२८ कोटी ३८ लाख ७४ हजार रुपयांची थकबाकी आहे.

….

कर संकलन विभागाचे उत्पन्न वाढत असताना पाणी पट्टीच वसूल होत नव्हती. त्यामुळे राज्यातील काही महापालिकेच्या कर संकलन आणि पाणी पट्टी एकत्र वसूल करण्याच्या निर्णयाचा सुक्ष्म पध्दतीने अभ्यास केला. त्यानुसार कर संकलन विभागाकडे मीटर निरीक्षक वर्ग करण्यात आले. त्याचे फलित म्हणूनपाणी पट्टी वसुलीचा आलेख वाढत आहे.
-प्रदीप जांभळे-पाटील
अतिरिक्त आयुक्त

Written By
Admin@BLOG

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"