Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

गुंतवणुकीद्वारे ज्यादा परताव्याचे अमिष; 1 कोटी 36 लाखाची फसवणूक!

गुंतवणुकीद्वारे ज्यादा परताव्याचे अमिष; 1 कोटी 36 लाखाची फसवणूक!

पिंपरी : शेअर ट्रेडिंग मध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन करून एका व्यक्तीस लिंक पाठवून व बनावट प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्यास भाग पाडून वेगवेगळ्या शेअर ट्रेडच्या नावाखाली 1 कोटी 36 लाख 50 हजार रुपये विविध बँक खातेवर भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. ही घटना 30 डिसेंबर 2025 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ऑनलाइन फ्लॅट क्रमांक एक, शिव अपार्टमेंट, लक्ष्मी नगर, चिंचवड येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी सुधीर भिवा पोवार (वय 53, रा. एक शिव अपार्टमेंट, लक्ष्मी नगर, चिंचवड) यांनी सायबर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. अर्पिता सिंह फेसबुक आयडी धारक ,लिंक धारक, टेलिग्राम आयडी धारक, सर्व बँक अकाउंट धारक व त्यांचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना आरोपी यांनी शेअर ट्रेडिंग मध्ये चांगला परतावा देण्याचे अमिष दाखवून विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना त्यांचे लिंक व बनावट फ्लॅटफार्मवर गुंतवणूक करण्यास भाग पाडून वेगवेगळ्या शेअर ट्रेडच्या नावाखाली 1 कोटी 36 लाख 50 हजार रुपये विविध बँक खात्यावर भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत. शेअर ट्रेडिंगच्या गुंतवणुकी द्वारे ज्यादा परताव्याचे अमिष दाखवून एक कोटी छत्तीस लाखाची फसवणूक

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"