Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

दुचाकी मध्ये पेट्रोल भरण्याकरिता पत्नीने पैसे न दिल्याने गळा दाबून मारहाण!

दुचाकी मध्ये पेट्रोल भरण्याकरिता पत्नीने पैसे न दिल्याने गळा दाबून मारहाण!

पिंपरी : पतीने पत्नीकडे तिच्या दुचाकी मध्ये पेट्रोल भरण्याकरिता पैसे मागितले असता पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याने पतीला राग आला. रागाच्या भरात पतीने आज तुझा काटा काढतो, तुला जिवंत सोडत नाही तुला मारून टाकतो असे बोलून पत्नीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हाताने जोरात गळा दाबला. ही घटना एक सप्टेंबर रोजी दहा वाजण्याच्या सुमारास गवारे यांचे घरात, अशोका सोसायटी संभाजीनगर, थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी एका तीस वर्षीय महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमनाथ रावसाहेब एडके (वय 36, रा. देवगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे पती आरोपी यांनी फिर्यादीकडील टू व्हीलर मध्ये पेट्रोल भरण्याकरिता पैसे मागितले असता फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा त्यांना राग आला. आरोपीने रागाच्या भरात तुला जिवंत सोडत नाही, तुला मारून टाकतो असे बोलून फिर्यादी यांना ठार मारण्याच्या उद्देशाने दोन्ही हाताने गळा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घरातील लोखंडी हातोड्याने फिर्यादीचे डावे हातावर, मनगटावर, दंडावर व कोपरावर जोरात मारून फिर्यादीला जखमी केले. तसेच हातोडा डोक्यात मारला परंतु फिर्यादी यांनी तो हुकवला. आरोपी यांनी फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. काळेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

रस्त्याने जाणाऱ्या तरुणाला दगडाने मारहाण!
पिंपरी : मोरवाडी कोर्टाजवळून रस्त्याने जात असलेल्या तरुणाच्या डोक्यात कोणतेही कारण नसताना मोठा दगड मारून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. बुधवार नऊ सप्टेंबर रोजी ही घटना घडली.

याप्रकरणी जीडी हिंसा कोब्रा (वय 29, रा. लालटोपी नगर, मोरवाडी, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन बालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुपरवायझर असून ते लेबर कॉलनीच्या रस्त्याने मोरवाडी कोर्टाजवळून जात होते .त्यावेळी संबंधित अल्पवयीन मुलाने कोणतेही जुने भांडण अथवा कारण नसताना अचानक मोठा दगड त्यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"