Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
पिंपरी-चिंचवड

महापालिका कार्यकारी अभियंता व उपअभियंता निलंबित!

महापालिका कार्यकारी अभियंता व उपअभियंता निलंबित!

पिंपरी : बांधकाम परवानगी प्रमाणपत्र देण्यासाठी अधिक रकमेची मागणी केल्याची तक्रार भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. याची दखल घेऊन आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विजय सोनवणे आणि उपाय अभियंता अशोक मोरे यांचे निलंबन केले आहे. त्यांची विभागीय चौकशी करून 15 दिवसात दोषारोपपत्र सादर करा असे आदेश आयुक्तांनी प्रशासन विभागात दिले आहेत.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बांधकाम परवानगी विभागातील गैरव्यवहाराबाबत तक्रार केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयुक्तांना पत्र देऊन चौकशी करण्याची सूचना केली होती. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. परंतु सह शहर अभियंता बांधकाम विभाग यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यांची देखील तक्रार हिंगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

पुनावळे येथील निवासी व वाणिज्य इमारतीच्या बांधकामास बांधकाम परवानगी देण्यात आलेली असून भोगवटा प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणाऱ्या प्रशासन शुल्काबाबतच्या अ आणि ब प्रपत्राच्या रकमेमध्ये तफावत आढळत असल्याने कार्यकारी अभियंता सोनवणे व उपअभियंता मोरे यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला होता. त्यांनी समर्पक खुलासा न केल्याने विभाग प्रमुखांनी खुलासा समाधानकारक नसल्याचे कळवले आहे. त्यावरून दोन्ही अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम तीन (एक), दोन तीन मधील तरतुदीचा भंग केला आहे. आयुक्तांनी त्यांचे निलंबन केले आहे. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करावी व पंधरा दिवसात दोषारोप पत्र ठेवण्यात यावे असे आदेश प्रशासन विभागात दिले आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"