Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
पिंपरी-चिंचवड

स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रविकासाची शपथ;महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण!

स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रविकासाची शपथ;महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण!

पिंपरी : “स्वातंत्र्य म्हणजे केवळ आपल्याला मिळालेला अधिकार नसून राष्ट्र आणि समाजाप्रती असलेली मोठी जबाबदारीदेखील आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास करताना प्रत्येक नागरिकाला दर्जेदार मूलभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुलभ सेवा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. स्वातंत्र्याची मूल्ये जपत लोककल्याण, पर्यावरण संवर्धन, महिला सन्मान आणि सर्वसमावेशक विकासाचा ध्यास घेऊन पिंपरी-चिंचवडला देशातील आदर्श शहर बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

viara vcc
viara vcc

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते देशभक्तिमय वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांच्या बलीदान,समर्पण व त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करताना महापौर लांडगे हे बोलत होते.

या सोहळ्यास आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर,आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर योगेश बहल, कला, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, ‘ल’ प्रभाग अध्यक्ष रेखा देवकर, नगरसदस्य मधुरा शिंदे, वर्षा जगताप, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले,मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे,सह आयुक्त मनोज लोणकर,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॅा. लक्ष्मण गोफणे,मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे,उप आयुक्त डॅा.प्रदीप ठेंगल,अण्णा बोदडे, वेंकटेश दुर्वास,ममता शिंदे,चेतना केरूरे,सह शहर अभियंता मनोज सेठीया,अजय सुर्यवंशी,प्रेरणा सिनकर यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागप्रमुख,अग्निशमन,आपत्ती व्यवस्थापन तसेच सुरक्षा अधिकारी, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उपस्थितांनी घेतल्या दोन सामूहिक शपथा
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उपस्थितांनी महिलांना समानतेने, आदराने आणि संवेदनशीलतेने वागणूक देण्याची शपथ घेतली तसेच महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळ निर्माण करण्यासोबतच पोश कायदा, पोश धोरण आणि शी-बाॅक्स पोर्टलबाबत व्यापक जनजागृती करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला याशिवाय विकसित, सक्षम आणि नागरिकाभिमुख पिंपरी-चिंचवडच्या निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच राष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत माती आणि पाणी ही निसर्गाने दिलेली अमूल्य संपत्ती असल्याची जाणीव अधोरेखित करण्यात आली. पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश केवळ घोषणेपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प उपस्थितांनी सामुहिक शपथ घेऊन केला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"