Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
पिंपरी-चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खराळवाडी मध्यवर्ती कार्यालय येथे ध्वजारोहन!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खराळवाडी मध्यवर्ती कार्यालय येथे ध्वजारोहन!

पिंपरी : भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. शहराध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाले की, भारत देश हा सर्वात मोठा शेती प्रधान व लोकशाही मानणारा देश आहे. भारत देशात अनेक धर्माचे, अनेक भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात व एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतात. आपण सर्वांनी देशासाठी बलीदान देणाऱ्या सैनिकांना व विविध क्षेत्रात देशासाठी योगदान देण्याऱ्या महामानवाचे नेहमी स्मरण करावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

viara vcc
viara vcc

यावेळी शहर कार्यकारिणीमध्ये भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष अकबर मुल्ला, राजेंद्र पवार, अर्बन सेल अध्यक्ष सचिन गायकवाड, जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष अविनाश कुलकर्णी, तर सेवादल सेल शहर कार्यकारिणी मध्ये चिंचवड विधानसभा अध्यक्ष पदी महेश माने, शहर राष्ट्रवादी सेवादल उपाध्यक्ष राजू भीमा लोणके, दीपक कार्की, गणेश ताम्हाणे, राम खरात, तर भोसरी विधानसभा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर रघुनाथ भालेकर, आकाश प्रदीप शेंडे, अमोल धनाजी कदम, सरचिटणीस धनराज अवधूत सूर्यवंशी, चिटणीस अमित नथु थोरात यांना नियुक्त पत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास , विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, सारंग कामतेकर, सतीश दरेकर, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष तथा नगरसेविका वर्षा जगताप, नगरसेवक विक्रांत लांडे, राजेंद्र जगताप, नगरसेविका निकिता कदम, सविता आसवानी, अथर्व कोकणे, कैलास बारणे, ॲड.सचिन औटे, ॲड.गोरक्ष लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, शेरबहादूर उर्फ मायला खत्री, कविता खराडे, संगीता कोकणे, तुषार ताम्हाणे, विशाल काळभोर, दीपक साकोरे, रवींद्र ओव्हाळ, युवराज पवार, श्रीकांत कदम, युसुफ कुरेशी, संग्राम चव्हाण, प्रशांत महाजन, दत्तात्रय जगताप, अरुण पवार, शक्रुल्ला पठाण, संपत पाचुंदकर, तुकाराम बजबळकर, प्रवीण गव्हाणे, महेश झपके, बाळासाहेब पिल्लेवार, अंकुश दिघे, नवनाथ डफळ, काळुराम खेडकर, गोरोबा गुजर, लहू तोरणे, रवींद्र सोनवणे, बापू सोनवणे, जहीर उर्फ छोटू खान, महेश किर्वे, उदय कुलकर्णी, महेश माने, प्रा. संतोष भांगे, शहाजी आतकर, भाग्यश्री मस्के, नीलम कदम, देवी थोरात, क्षमा सय्यद, स्वराज शिंदे, इमरान शेख, अविनाश सोनवणे, उदय ववले, सुनील जाधव, अंकुश दिघे, रमजान सय्यद, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इत्यादी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, भोसरी विधानसभा सेवादल अध्यक्ष प्रवीण पिंजन यांनी केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"