फक्त मुद्द्याचं!

27th April 2026
पिंपरी-चिंचवड

स्वच्छता, अतिक्रमण व अनधिकृत नळ जोडण्यांवर कडक कारवाई : आयुक्त

स्वच्छता, अतिक्रमण व अनधिकृत नळ जोडण्यांवर कडक कारवाई : आयुक्त

अ‍ॅक्शन मोडमध्ये काम करण्याचे प्रशासनाला आदेश
पिंपरी, : पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. नागरिकांनीही जबाबदारीने वागून नियमांचे पालन करावे आणि घर खरेदी करताना बांधकामास अधिकृत परवानगी असल्याची खात्री करावी. अनधिकृत जाहिराती, अतिक्रमणे, बेकायदेशीर नळ जोडण्या तसेच परवानगीशिवाय सुरू असलेल्या बांधकामांवर अधिक तीव्र आणि कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रमुख अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत अनधिकृत जाहिराती, अतिक्रमणे, बेकायदेशीर नळजोडण्या तसेच परवानगीशिवाय सुरू असलेल्या बांधकामांसंबधी आढावा बैठक घेऊन त्यांनी प्रशासनाला अ‍ॅक्शन मोडमध्ये काम करण्यास सांगितले. यावेळी ते बोलत होते.

दृकश्राव्य माध्यमाद्वारे झालेल्या या बैठकीत अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सचिन पवार, अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अमित पंडित, किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, किशोर ननवरे, परशुराम वाघमोडे, राजाराम सरगर, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, पूजा दुधनाळे, निवेदिता घार्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

शहरात स्वच्छता राखण्यासाठी विशेष भर देण्यात येणार असून, भिंती, दूरध्वनी खांब आणि एम एस ई डीसीएल डीपीवर लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर आणि जाहिरात फलक तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच, अशा फलकांवरील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधून संबंधितांना नोटीस बजावण्याची कारवाईही करण्यात येणार आहे. अतिक्रमणमुक्त फुटपाथसाठी मोहीम तीव्र करावी पादचाऱ्यांना मोकळे आणि सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी “अतिक्रमणमुक्त फुटपाथ” मोहिमेला गती देण्यात येत असून, विशेष पथके क्षेत्रीय स्तरावर कार्यरत राहणार आहेत.

अनधिकृत नळ कनेक्शनवर थेट कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. शहरातील बेकायदेशीर नळजोडण्या शोधून त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अनधिकृत बांधकामांवरही कठोर कारवाई करण्यात येईल त्यामध्ये परवानगीशिवाय सुरू असलेल्या बांधकामांवर महापालिका कडक कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

अनधिकृत बांधकामे महापालिका निष्कासित करणार आहे.त्यामुळे नागरिकांनी बांधकाम परवानगी नसलेल्या ठिकाणची सदनिका खरेदी करू नये.खरेदी करीत असलेले घर किंवा सदनिकेला अधिकृत बांधकाम परवानगी असल्याची खात्री करावी असे आवाहन आयुक्त डॅा विजय सुर्यवंशी यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"