तडीपार आदेशाचा भंग; आरोपीला अटक

पिंपरी : तडीपार आदेशाचा भंग करून सार्वजनिक रोड लगत कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने हातात लोखंडी तलवार घेऊन उभा असलेल्या आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई रविवार 26 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एमआयडीसी, बौद्ध नगर, पिंपरी येथे करण्यात आली.

समीर लक्ष्मण ढवळे पोलीस शिपाई, पिंपरी पोलीस ठाणे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अविनाश प्रकाश माने (वय 26, रा. पाण्याच्या टाकीजवळ एमआयडीसी. बौद्ध नगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी आरोपीला तडीपार केले आहे. तरी देखील सदर आदेशाचा भंग करून सार्वजनिक रोड लगत हातात लोखंडी तलवार घेऊन कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने उभा असताना पोलिसांनी कारवाई करून अटक केली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घातक शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना आरोपीने लोखंडी तलवार जवळ बाळगल्याने आरोपीवर कारवाई करण्यात आली. पिंपरी पोलीस ठाण्याचे हवालदार पाटील हे तपास करत आहेत.

