फक्त मुद्द्याचं!

27th April 2026
गुन्हेगारी

कामाचे पैसे मागितल्याने जबर मारहाण सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल!

कामाचे पैसे मागितल्याने जबर मारहाण सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल!

चाकण: कामाच्या बिलाचे पैसे मागितले म्हणून सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीला बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवार 26 एप्रिल रोजी रात्री पावणे एकच्या सुमारास काळूस ग्रामपंचायत जवळ, ता. खेड येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी अभय किसन डोंगरे (वय 22, रा. अरगडे वस्ती- जाचक वस्ती रोड, काळुस, ता. खेड) यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अमोल आवटे, अजय बहुले, निखिल खैरे, सत्यवान म्हसाडे , मारुती गव्हाणे व इतर अनोळखी दोन ते तीन जण ,सर्वांचा पत्ता माहित नाही)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी आरोपी सत्यवान म्हसाडे यांच्याकडे कामाच्या बिलाचे पैसे मागितले म्हणून आरोपी क्रमांक एक ते पाच व त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्तींनी बिलाचे पैसे पाहिजेत का? असे बोलून फिर्यादीस शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने, हॉकी स्टिकने मारहाण केली. शेखर गोरख पोटवडे हा भांडणे सोडवत असताना त्याला देखील हॉकी स्टिकने मारहाण करून त्याचे उजव्या हाताला मार लागला. आरोपी क्रमांक चार सोबतचे सर्व आरोपी मारहाण करून पळून जात असताना फिर्यादीचे वडील त्यांना थांबवित होते. त्यांना त्यांचे फ्रान्स गाडी क्रमांक (एम एच /14 /76 55) या गाडीच्या बोनेटवर घेऊन शंभर फूट पुढे घेऊन गेले व खाली ढकलून दिले. त्यामुळे ते जखमी झाले. याबाबत चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"