हॉटेल्स मधील गुंतवणुकीवर परतावा न देता फसवणूक!

पिंपरी : नामांकित हॉटेल्स मध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे अमिष दाखवून गुंतवणूकदाराची नऊ लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 18 जानेवारी ते 25 एप्रिल या कालावधीत हिंजवडी आणि वाकड येथील हॉटेलमध्ये घडली.
याबाबत अजिनाथ सुखदेव वारे (वय 35, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अखंड भारत मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक पुष्पेन्द्र मौर्य, सत्यप्रकाश मौर्य, चंद्रहास शर्मा, समीर राहणे, आणि एक महिला संचालिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी आणि इतर गुंतवणूकदारांकडून हिंजवडी मधील हॉटेल हिल्टन आणि वाकड येथील हॉटेल टीप टॉप येथे रोख स्वरूपात एकूण नऊ लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक स्वीकारली. सुरुवातीला काही दिवस परतावा देऊन नंतर परतावा देणे बंद केले आणि मुद्दलही परत न करता फसवणूक केली.

देशी बनावटीचे पिस्तूल जप्त ;आरोपी अटकेत
पिंपरी : कोणताही घातक व दाहक पदार्थ जवळ बाळगण्यास प्रतिबंध असताना एका व्यक्तीकडे देशी बनावटीचे पन्नास हजार पाचशे रुपये किंमतीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळाल्याने अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवार 25 एप्रिल रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास बापदेव महाराज मंदिरा शेजारील मोकळ्या मैदानात, किवळे येथे करण्यात आली.
याप्रकरणी संतोष दशरथ कोळगे (वय 42, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रावेत पोलीस स्टेशन) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुबारक उर्फ डब्या मजीत कुरेशी (वय 25, रा म्हाडा कॉलनी, बी. बिल्डिंग, फ्लॅट नंबर 706, वारजे, माळवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीमध्ये कोणताही दाहक अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील दगड अथवा घातक शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध आहे .या आदेशाचा भंग करून आरोपी यांनी पन्नास हजार पाचशे रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस असे कोणताही कायदेशीर परवाना नसताना अवैदरीत्या जवळ बाळगले. रावेत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक टार्फे हे तपास करत आहेत. देशी बनावटीचे पिस्तूल जप्त ;आरोपी अटकेत

