फक्त मुद्द्याचं!

20th June 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कुष्ठरोग शोध मोहीम’; ११ रुग्णांना कुष्ठरोग असल्याचे निदान!

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कुष्ठरोग शोध मोहीम’; ११ रुग्णांना कुष्ठरोग असल्याचे निदान!

वैद्यकीय विभागाच्या पथकांमार्फत शहरभर गृहभेटी, तपासण्या, उपचार आणि जनजागृती
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे दि. १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत ‘कुष्ठरोग शोध मोहिम’ प्रभावीपणे राबविण्यात आली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या अधिपथ्याखाली पार पडलेल्या या संपूर्ण मोहिमेचा उद्देश शहरातील नागरिकांमध्ये कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे, रुग्णांचे निदान करणे तसेच वेळेवर उपचार उपलब्ध करून देणे हा होता. या पथकाने एकूण ७९,१७७ घरांना प्रत्यक्ष भेटी दिल्या व सुमारे ३,६१,८५४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान ११ रुग्णांना कुष्ठरोग असल्याचे निदान झाले

viara vcc
viara vcc

वैद्यकीय विभागाच्या पथकामार्फत संपूर्ण शहरातील विविध वसाहती, झोपडपट्ट्या, घनदाट लोकवस्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल क्षेत्रे तसेच संवेदनशील भागांमध्ये गृहभेटीद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात आली. मोहिमेदरम्यान पथकाने त्वचेवरील डाग, संवेदना कमी होणे, मुंग्या येणे, सूज, किंवा कुष्ठरोगाची कोणतीही संभाव्य लक्षणे असलेल्या नागरिकांचे बारकाईने परीक्षण केले. संशयित रुग्णांना तत्काळ प्राथमिक औषधोपचार देण्यात आले व पुढील मार्गदर्शन करण्यात आले.

महानगरपालिकेच्या या व्यापक मोहिमेमुळे शहरात कुष्ठरोगाविषयी जनजागृती वाढली असून लक्षणे असलेल्या अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने तपासणी केली. वैद्यकीय विभागातर्फे मोहिमेदरम्यान समुपदेशन, उपचार, मार्गदर्शन आणि फॉलो-अप यावरही विशेष भर देण्यात आला. शहराच्या आरोग्य रक्षणासाठी महानगरपालिका सतत प्रयत्नशील असून अशा उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

वैद्यकीय पथकातर्फे शहरभर गृहभेटी, तपासण्या आणि जनजागृती
सदर मोहिमेसाठी वैद्यकीय विभागाच्या वतीने एकूण २१२ जनांचे पथक तैनात करण्यात आले होते, ज्यामध्ये तज्ञ डॉक्टर, सूपरवायजर व प्रशिक्षित आशा स्वयंसेविका तसेच परूष स्वयंसेवकांचा समावेश होता. सहा. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली . संशयित रुग्णांना तत्काळ प्राथमिक औषधोपचार देण्यात आले व पुढील मार्गदर्शन करण्यात आले.

“कुष्ठरोगाची लक्षणे अनेकदा लहान वाटतात पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास आजार वाढू शकतो. त्यामुळे वैद्यकीय पथकांनी प्रत्यक्ष लोकांपर्यंत जाऊन केलेले सर्वेक्षण अत्यंत निर्णायक ठरले. तपासणी, उपचार आणि समुपदेशन या तीन गोष्टींनी आपण शहराला कुष्ठमुक्त करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकत आहोत.” – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"