Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

शेअर्स खरेदीत चांगला नफा देण्याचे अमीष; 1 कोटी 6 लाख रुपयांची फसवणूक!

शेअर्स खरेदीत चांगला नफा देण्याचे अमीष; 1 कोटी 6 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : बनावट शिवालिकाक ब्रोकरेज कंपनीचे एजंट असल्याचे भासवून या कंपनी मार्फत वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करिता 1 कोटी सहा लाख 75 हजार रुपये भरण्यास भाग पाडून एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली. ही घटना दहा नोव्हेंबर 2025 ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑनलाइन करण्यात आली

viara vcc
viara vcc

याप्रकरणी जनार्धन बाळकृष्ण जगदाळे (वय 54, रा. वूड्स हिला, फेज एक बी टू फ्लॅट नंबर १२०१, बोराडे वाडी, मोशी) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आयुष पटेल ,नीरज मित्रा, अनुपभाई पटेल (राजकोट गुजरात) व युनियन बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक धारक तसेच त्यांचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगणमत करून फिर्यादीशी ऑनलाइन संपर्क करून बनावट शिवालिकाक ब्रोकरेज कंपनीचे एजंट असल्याचे तसेच सदर कंपनी शिबिर रजिस्टर असल्याबाबत सर्टिफिकेट दाखवून कंपनी खरी असल्याचे सांगितले. सदर कंपनी मार्फत फिर्यादीस शेअर खरेदीच्या चांगल्या टिप्स देऊन नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवले. शिवालिकाक ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये डिमॅट अकाउंट उघडल्याचे सांगून कंपनीचे मार्फतीने वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करिता फिर्यादीस वेळोवेळी 1 कोटी सहा लाख 75 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. whatsapp वरून फिर्यादीस बनावट मोठा नफा दाखविला. फिर्यादीने सदर नफा व मूळ रक्कम परत देण्यास सांगितले .आरोपींनी सदर रक्कम परत केली नाही. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस निरीक्षक गायकवाड हे तपास करत आहेत.

indra deari
indra deari

बनावट बँक स्टेटमेंट द्वारे पाच कोटी 67 लाख रुपयांचा अपहार!
पिंपरी : पिंपळे निलख येथील कंपनीत काम करणाऱ्या अकाउंटटने पासवर्डचा गैरवापर करून तब्बल पाच कोटी 67 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना 4 जानेवारी 2025 ते 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत घडली.

या प्रकरणी अमित दिलीप परदेशी (वय 38, रा. जुन्नर, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश कुमार बाशिष्ट नारायण साह (वय 46, रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने कंपनीच्या बँक व्यवहारासाठी दिलेल्या पासवर्डचा गैरवापर करून 5 कोटी 67 लाख 6592 रूपये स्वतःच्या बँक खात्यात वळवून अपहार केला. व बनावट बँक स्टेटमेंट बनवून फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"