फक्त मुद्द्याचं!

6th June 2026
गुन्हेगारी

घरगुती गॅस सिलेंडर चढ्या दराने विक्री करीत असताना कारवाई!

घरगुती गॅस सिलेंडर चढ्या दराने विक्री करीत असताना कारवाई!

चाकण : बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करून चढ्या दराने गॅस सिलेंडर विक्री करीत असताना जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई गुरुवार चार जून रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास चाकण गावचे हद्दीत चाकण ते आगरकरवाडी जाणाऱ्या रोडवर करण्यात आली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी शिवाजी दत्तात्रेय लोखंडे पोलीस शिपाई, चाकण उत्तर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दाखल केली आहे. विवेक लालमन गुप्ता (वय 45, रा. मराठी शाळेसमोर आगरकरवाडी, चाकण ,ता. खेड) यांना बीएनएसएस 35 (3) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण आगरकरवाडी जाणाऱ्या रोडवर सिद्धार्थ बौद्ध विहार समोर आरोपी हा त्यांच्या ताब्यात असलेल्या पिवळ्या रंगाच्या पॅगो कंपनीच्या गाडी (नंबर एम एच 14 एफ टी 10 67) मध्ये 69 हजार रुपये किंमतीचे 23 भरलेले गॅस सिलेंडर टाक्या अवधरीत्या चढ्या भावाने विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळून आला .उत्तर चाकण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडे हे अधिक तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"