ज्यादा फायदा देण्याचे आमिष दाखवून 4 कोटी 43 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : एका व्यक्तीला व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास 1000% पेक्षा ज्यादा फायदा देण्याचे आमिष दाखवून 4 कोटी 43 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना सात मे ते एक जून 2026 या कालावधीत रोझलँड रेसिडेन्सी, गेट नंबर चार, पिंपळे सौदागर येथे घडली.

याबाबत एका व्यक्तीने सायबर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. व्हाट्सअप मोबाईल नंबर मायरा शर्मा ,लिंकधारक, बँक अकाउंट धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन आरोपी क्रमांक एक यांनी त्यांच्या व्हाट्सअप वरून ग्रुप मध्ये जॉईन करून त्यांचे सांगण्यावरून शेअर ट्रेडिंग केल्यास हजार टक्के पेक्षा जादा फायदा देण्याचे अमिष दाखवून लिंक द्वारे वेगवेगळ्या शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली वेगवेगळ्या बँकांमध्ये फिर्यादीस 4 कोटी 43 लाख 25 हजार रुपये भरण्यास भाग पाडून त्यानंतर एप्लीकेशन वर या गुंतवणुकीवर 26 कोटी 64 लाख 46 हजार 237 रुपये खोटा नफा दाखविला. तो काढण्यासाठी एकूण 1 कोटी 7 लाख 37 हजार 885 रुपये सर्विस चार्जचे कारण सांगून भरण्यास सांगितले. अशा प्रकारे फिर्यादीची एकूण चार कोटी त्रेचाळीस लाख 25 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. सायबर पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक नाळे हे अधिक तपास करत आहेत.

