फक्त मुद्द्याचं!

9th June 2026
गुन्हेगारी

‘एम परिवहन’ ॲप; 4लाख 76 हजार 44 रुपयांची ऑनलाइन फसवणूक

‘एम परिवहन’ ॲप; 4लाख 76 हजार 44 रुपयांची ऑनलाइन फसवणूक

पिंपरी : बनावट व्हाट्सअप वर ‘एम परिवहन’ ॲपच्या नावाने मेसेज पाठवून एका व्यक्तीच्या मोबाईलचा अनधिकृत ताबा मिळवत चार लाख 76 हजार 44 रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना आळंदीतील वडगाव रोड परिसरात घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी 51 वर्षीय व्यक्तीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीला त्यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप द्वारे ‘एम परिवहन’चा मेसेज करण्यात आला. त्यामध्ये त्यांच्या दुचाकी वर एक हजार रुपयांचा दंड असल्याचे दाखवण्यात आले. दंडाची माहिती पाहण्यासाठी त्यांनी ‘व्ह्यु’ चलन या पर्यायावर क्लिक केले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाऊनलोड झाले व काही वेळातच स्क्रीन वरून गायब झाले. या ॲपच्या माध्यमातून आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलचा अनधिकृत एक्सेस घेत कॉल फॉरवर्डिंग सुरू केले. त्यानंतर फिर्यादीच्या फ्लिपकार्ड खात्यावरून त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर करून सॅमसंग कंपनीचे चार मोबाईल खरेदी करण्यात आले. या व्यवहारातून फिर्यादीची चार लाख 76 हजार 44 रुपयांची फसवणूक झाली. आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस याबाबतचा तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"