फक्त मुद्द्याचं!

6th June 2026
पिंपरी-चिंचवड

अवैध दारूच्या साखळीवर संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय!

अवैध दारूच्या साखळीवर संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय!

पिंपरी : अवैध दारू धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने भेसळयुक्त दारू, अवैध दारू गाळणे आणि अवैध दारू विक्रीच्या जाळ्याविरुद्ध गुप्त माहितीची देवाण-घेवाण आणि संयुक्त अंमलबजावणी मजबूत करण्याचा निर्णय पुणे पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्यात एका बैठकीत घेण्यात आला. पुणे ,पिंपरी चिंचवड मध्ये विषारी दारुमुळे 27 जणांना जीव गमवावा लागला .यामुळे पोलीस विभागाला बदनामी सहन करावी लागली. या पार्श्र्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली असत्याचे समजते.

viara vcc
viara vcc

या बैठकीचे आयोजन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले होते. पुणे जिल्ह्यातील पुणे ,पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण या हद्दीतून अवैध दारू धंद्याचे समुळ उच्चाटन कसे करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. संयुक्तपणे माहितीची देवाणघेवाण करून गुप्तपणे या कारवाया करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड येथे ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीला पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर ,अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली (प्रादेशिक विभाग), पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे अतुल कानडे, सी गिरीश हुकरे, अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे चीतू मुल्ला रजनीकांत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर ,रोहिदास पवार पोलीस उपयुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड आदी उपस्थित होते, अवैध दारूच्या साखळीवर संयुक्त कारवाई करणार

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"