Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

ओला कॅब चालकाने चोरले चार तोळे सोन्याचे दागिने!

ओला कॅब चालकाने चोरले चार तोळे सोन्याचे दागिने!

पिंपरी : ओला कॅब मधून प्रवास करताना गाडीत राहिलेले दोन लाखाचे दागिने असलेली बॅग कॅब चालकाने चोरून नेली. हा प्रकार निगडी येथे उघडकीस आला .31 जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी ओला चालक संदेश निवृत्ती सोनवणे (रा. देहूगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यश्री आनंद लोहार (वय 30, ओवी होम सोसायटी, देहूगाव) यांनी शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी देहूगाव ते निगडी असा प्रवास करून उतरल्या. मात्र त्यांची सॅक गाडीतच विसरली. आरोपी चालकाने बॅग मधील एक लाख 98 हजार रुपये किंमतीचे चार तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी निगडी पोलीस तपास करीत आहेत.

indra deari
indra deari

नेहरूनगर येथील मटका अड्ड्यावर कारवाई!
पिंपरी : नेहरूनगर येथील मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाने छापा टाकून मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली.

या प्रकरणी शिराज अब्दुल मजीत पटेल (वय 38, रा. भोसरी), श्याम बळी कांबळे (वय 61, रा. चिंचवड), शामराव राजाराम पाटेकर (वय 66, नेहरूनगर) आणि रवी थापा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई लक्ष्मीकांत पतंगे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कुलदीप अंगण सोसायटीच्या गेट समोर चिठ्ठ्यांवर कल्याण मटक्याचे आकडे लिहून पैसे घेत असताना रंगेहात पकडले गेले .त्यांच्याकडून 11930 रुपयांचे साहित्य व रोकड जप्त करण्यात आली. याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत. नेहरूनगर येथील मटका अड्ड्यावर कारवाई!

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"