Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

14th September 2026
पिंपरी-चिंचवड

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पवना धरणावर जलपूजन!

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पवना धरणावर जलपूजन!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने पूर्ण क्षमतेने पाणीसाठा गाठल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते जलपूजन करून जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी शहराला वर्षभर पुरेसा, नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली. जलपूजनाच्या माध्यमातून पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच ‘पाणी वाचवा, जलस्रोत जपा आणि भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षित शहर घडवा’ हा संदेश देण्यात आला.

viara vcc
viara vcc

पवना धरण हे पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे जलस्रोत आहे. यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जलपूजनाच्या माध्यमातून जलस्रोतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच पाण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला.

जलपूजनाच्या निमित्ताने जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर, नदीपात्राची स्वच्छता आणि जलपरिसराचे संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची गरज असल्याने उपलब्ध जलसाठ्याचे जतन करणे आणि त्याचा योग्य वापर करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरीदे, जलसंपदा विभागाचे रजनीश भारिया यांच्यासह महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"