Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
गुन्हेगारी

ज्यादा परताव्याचे आमिष; 11 कोटी 67 लाखाला गंडा!

ज्यादा परताव्याचे आमिष; 11 कोटी 67 लाखाला गंडा!

पिंपरी : विविध कंपन्यांमध्ये इक्विटी शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमीष दाखवून एका व्यक्तीसह त्याच्या सहकाऱ्यांची तब्बल 11 कोटी 67 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 11 मे 2025 ते 2 सप्टेंबर 2026 या कालावधीत वाकड येथील व्हाईट स्क्वेअर ऑफिसमध्ये घडली.

दीपक दत्तात्रेय बर्गे (वय 40, रा. भुगाव, ता. मुळशी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन चंद्रकांत साळुंखे (वय 37 ), श्वेता सचिन साळुंखे (वय 35, रा पिंपळे निलख) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी आपण कॅफेचे मालक असल्याचे सांगत फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. गुंतवणुकीच्या बदल्यात इक्विटी शेअर्स आणि चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले. आरोपींवर विश्वास ठेवून फिर्यादी इतरांनी एकूण 11 कोटी 67 लाख रुपये गुंतवले. परंतु आरोपींनी या रकमेचा अपहार करून पैसे परत न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर 42 लाखाची फसवणूक!
पिंपरी : ट्रेडिंग मधून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ट्रेडएक्स नावाच्या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्यास भाग पाडून वाकड मधील तरुणाची 42 लाख 43 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 13 ऑगस्ट 2025 ते 16 ऑगस्ट 2026 या कालावधीत घडली.

याप्रकरणी सुनील अंतु दवंगे (वय 29, रा. वाकड, मूळ- रा. कोपरगाव, अहिल्यानगर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीशी मोबाईल वरून संपर्क साधून ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार फिर्यादीने टप्प्याटप्प्याने 42 लाख 43 हजार रुपये गुंतवले. दरम्यान पैसे परत मागितल्यानंतर डमी फ्लॅटफार्मवर फिर्यादीची गुंतवणूक शून्य दाखवण्यात आली. संशय आल्याने फिर्यादीने सेबीच्या संकेतस्थळावर तपासणी केली असता संबंधित कंपनी नोंदणीकृत नसल्याचे उघड झाले. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"