फक्त मुद्द्याचं!

21st April 2026
पिंपरी-चिंचवड

सह्यांद्री किंग्ज्‌ आणि सोनीगरा सुपरकिंग्ज्‌‍ संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

सह्यांद्री किंग्ज्‌ आणि सोनीगरा सुपरकिंग्ज्‌‍ संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

दुसरी ‌‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग‌’ टी-२० क्रिकेट स्पर्धा;सह्यांद्री किंग्ज्‌ ; सुशांत अभंग सामनावीर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित दुसऱ्या “पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग‌’ (पीसीपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत सोनीगरा सुपरकिंग्ज्‌‍ आणि सह्यांद्री किंग्ज्‌‍ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सुशांत अभंग याने केलेल्या ७६ धावांच्या मदतीने सह्यांद्री किंग्ज्‌‍ने शेट्टी बन्ट् वॉरीयर संघाचा ४६ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सह्यांद्री किंग्ज्‌‍ संघाने २० षटकामध्ये १७५ धावांचे लक्ष्य उभे केले. सुशांत अभंग ४१ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली. वेदांत हंचे (नाबाद २४ धावा) आणि प्रद्युम्न आटपाडकर (नाबाद २० धावा) यांनीही दुसऱ्या बाजुने साथ दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना शेट्टी बन्ट् वॉरीयर संघाचा डाव १७.५ षटकात १२९ धावांवर संपुष्टात आला. श्रेयस जाधव (४० धावा), पारस चव्हाण (३१ धावा) आणि यश जाधव (२८ धावा) यांनी धावांचे योगदान देऊन प्रतिकार केला. अभिषेक राय याने तीन गडी बाद केले. याशिवाय पियुष पाटील आणि लोकेश चौधरी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला.

ershad shekh 1
ershad shekh 1

इर्शाद शेख याने केलेल्या ६३ धावांच्या जोरावर सोनीगरा सुपरकिंग्ज्‌‍ संघाने प्रतिक रॉयल्स्‌‍ संघाचा ५ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रतिक रॉयल्स्‌‍ संघाने १४८ धावा धावफलकावर लावल्या. रूद्र पटेल (४६ धावा), सईश शिंदे (४० धावा) आणि रोमित जोशी (२५ धावा) यांनी संघाचा डाव बांधला. प्रमोद उगाळे आणि गौरव जोत्शी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हे लक्ष्य सोनीगरा सुपरकिंग्ज्‌‍ संघाने १९.५ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. इर्शाद शेख याने ५५ चेंडूत १० चौकारांसह ६३ धावांची खेळी केली. यासह श्रेयस केळकर (नाबाद ३३ धावा) आणि रूहुल्ला नदाफ (२० धावा) यांनी धावा जमवून संघाचा विजय सोपा केला.

विजेतेपदासाठी रविवार 26 एप्रिल रोजी सह्यांद्री किंग्ज्‌ आणि सोनीगरा सुपरकिंग्ज्‌‍ संघांमध्ये लढत होणार आहे.
सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः
सह्यांद्री किंग्ज्‌ : २० षटकात ६ गडी बाद १७५ धावा (सुशांत अभंग ७६ (४१, ९ चौकार, ३ षटकार), वेदांत हंचे नाबाद २४, प्रद्युम्न आटपाडकर नाबाद २०, गणेश कालेल ३-२८) वि.वि.
शेट्टी बन्ट् वॉरीयरः १७.५ षटकात १० गडी बाद १२९ धावा (श्रेयस जाधव ४०, पारस चव्हाण ३१, यश जाधव २८, अभिषेक राय ३-११, पियुष पाटील २-२२, लोकेश चौधरी २-२६); सामनावीरः सुशांत अभंग; फायटर ऑफ द मॅच: गणेश कालेल.

प्रतिक रॉयल्स्‌ : १९.४ षटकात १० गडी बाद १४८ धावा (रूद्र पटेल ४६, सईश शिंदे ४०, रोमित जोशी २५, प्रमोद उगाळे २-१५, गौरव जोत्शी २-३५) पराभूत वि
सोनीगरा सुपरकिंग्ज्‌ : १९.५ षटकात ५ गडी बाद १४९ धावा (इर्शाद शेख ६३ (५५, १० चौकार), श्रेयस केळकर नाबाद ३३, रूहुल्ला नदाफ २०, शाहेबाज सय्यद २-४५); सामनावीरः इर्शाद शेख; फायटर ऑफ द मॅच: रुद्र पटेल;

vcc aksyay trutiya
vcc aksyay trutiya

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"