फक्त मुद्द्याचं!

21st April 2026
पिंपरी-चिंचवड

भाजप स्वीकृत सदस्यांबाबत निर्णय नाही; इच्छुक धास्तावले!

भाजप स्वीकृत सदस्यांबाबत निर्णय नाही; इच्छुक धास्तावले!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत भाजप सदस्यांची निवड पुन्हा एकदा एकमत न झाल्याने पुढे ढकलण्याची नामुष्की भारतीय जनता पक्षावर आली आहे. यामुळे इच्छुक असलेल्या सदस्यांची धाकधूक वाढली आहे.

vcc aksyay trutiya
vcc aksyay trutiya

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीनंतर दहा स्वीकृत सदस्यांची निवड एक महिन्याच्या आत करणे आवश्यक असताना भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे निर्णय लांबणीवर गेला आहे. पुणे महापालिका स्वीकृत सदस्यांची निवड 9 मार्च रोजी करण्यात आली. परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत भाजप सदस्यांची का होत नाही? आपल्या समर्थकांना न्याय मिळावा यासाठी आमदार आणि शहर भाजप अध्यक्ष प्रयत्न करीत असल्याने निवड लांबणीवर पडत आहे अशी चर्चा भाजपमध्ये सुरु आहे. सोमवार 20 एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर होण्याची शक्यता असताना अचानक महापालिका सभा तहकूब करण्याची सूचना मांडण्यात आली. कारण होते संसदेतील महिला विधेयक विरोधी पक्षांनी फेटाळल्याचे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या तीन सदस्यांची नावे यापूर्वी जाहीर केली आहेत, मात्र भाजपच्या सात सदस्यांच्या नावाबाबत एकमत होत नसल्याने हा निर्णय प्रदेश अध्यक्षांकडे सोपविण्यात आला आहे. परंतु अजूनही त्यांनी याबाबत निर्णय घेतला नाही. सात जागांमध्ये निष्ठावंत, माजी नगरसेवक, महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले इच्छुक, हिंदुत्ववादी संघटना, आरएसएस अशा सदस्यांना स्थान पाहिजे आहे . भाजपमध्ये तीनशे पेक्षा जादा अर्ज आले असून जागा मात्र सातच आहेत. महापालिका निवडणुकीत अनेकांना उमेदवारी मागे घेताना स्वीकृत सदस्याचे गाजर भाजपने दाखवले होते. त्यांचे काय होणार? त्यामुळे उमेदवारी देण्यासाठी एकमत होत नाही .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"