फक्त मुद्द्याचं!

21st April 2026
गुन्हेगारी

दुकानदाराला ब्लॅकमेल करुन सात लाखाची उकळली खंडणी!

दुकानदाराला ब्लॅकमेल करुन सात लाखाची उकळली खंडणी!

पिंपरी : रुपीनगर परिसरात एका दुकानदाराला खोट्या केस मध्ये अडकवण्याची धमकी देऊन लाखो रुपये आणि सोन्याची अंगठी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना एक मार्च 2025 ते 19 एप्रिल 2026 या कालावधीत रुपीनगर तळवडे येथे घडली.

vcc aksyay trutiya
vcc aksyay trutiya

याप्रकरणी कैलास भास्कर चौधरी (वय 47, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आहे. याबाबत सचिव उर्फ तानाजी नायकुडे (रा. रुपीनगर, तळवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचा जुना व्यवहार पूर्ण झालेला असतानाही आरोपीने जुन्या पैशांची मागणी करत त्याला धमकावले. पैसे न दिल्यास शॉप बंद पडण्याची आणि शॉप मध्ये गांजा आणून ठेवून जेलमध्ये पाठवण्याची धमकी त्यांनी दिली. या भीतीपोटी फिर्यादीने आरोपीला आजवर सात लाख 900 रुपये रोख, एक सॅमसंग मोबाईल फोन आणि पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी दिली आहे. आता आरोपी पुन्हा एक लाख 70 हजार रुपयांची मागणी करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुकानदाराला धमकावून खंडणी उकळली

आराम लॉजवर दिघी पोलिसांचा छापा; एकास अटक
पिंपरी : वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या आराम लॉजवर दिघी पोलिसांनी छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली आहे. ही कारवाई रविवार 19 एप्रिल रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास आराम लॉज (देहू फाटा- आळंदी) येथे करण्यात आली.

याप्रकरणी पोलिस अंमलदार अरुण दामसे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश बाबाजी डुंबरे (वय 32, रा. देहू फाटा- आळंदी) याला अटक केली आहे. त्याच्यासह विजय गणेश शेट्टी (रा देहू फाटा- आळंदी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी एका महिलेला कामाचे आमीष दाखवून तिला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले. पोलिसांनी घटनास्थळावरून एकोणीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"