Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
राजकारण

अमित गोरखेंकडून फडणवीसांचे अभिनंदन

अमित गोरखेंकडून फडणवीसांचे अभिनंदन

देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन अमित गोरखे यांनी घेतली भेट

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहि‍णींनी भावांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत. लोकसभेत संविधान विरोधी फेक नरेटिव्हचा बळी ठरलेला समाज आता जागृत ढाला आणि विधानसभेत भारतीय जनता पक्षाला भरभरून मत दिले, असे म्हणत विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

अमित गोरखे यांनी मुंबईत सागर निवासस्थानी फडणवीस यांची भेट घेतली. गोरखे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली, भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान दिले आहे. जनतेला ही कळून चुकले आहे की काँग्रेस हीच खरी संविधानाची मारक असून त्यांनी केवळ जनतेमध्ये गोंधळ निर्माण व्हावा म्हणून फेक नरेटिव्हची पेरणी केली. पण जनतेने हा त्यांचा डाव ओळखून त्यांना यावेळेस धुडकावून लावून भाजपला भरभरून मतदान केले आहे.

गोरखे म्हणाले की, काँग्रेसने वापरलेला वोट जिहादचा नारा सुद्धा तमाम हिंदू बांधवांनी धुडकावून लावला. काँग्रेसची राजनीती ही जातीय वादी आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. हा संविधानाचा विजय आहे आणि महायुती सरकारचा विजय आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"