Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
पिंपरी-चिंचवड

हुंदाई मोटार इंडिया फाउंडेशन कडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास बॅरिकेट्स भेट!

हुंदाई मोटार इंडिया फाउंडेशन कडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास बॅरिकेट्स भेट!

रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन 300 वाहतूक बॅरिकेट्स
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने हुंदाई मोटार इंडिया फाउंडेशन (एचएमआयएफ) यांच्यामार्फत ईझी रोडस् उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला 300 वाहतूक बॅरिगेट्स भेट देण्यात आल्या.

viara vcc
viara vcc

बॅरिकेटस् हस्तांतर कार्यक्रमास पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, पोलीस सहायुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे सारंग आवाड, अप्पर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग बसवराज तेली, पोलीस उपायुक्त वाहतूक विक्रांत देशमुख तसेच हुंदाई मोटार इंडिया लिमिटेड एचएमआयएफ तर्फे श्याम कुमार सिंह, फंक्शन लीड प्रोडक्शन हुंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे प्लांट हेड श्याम सिंग, कार्पोरेट अफेयर्स महाराष्ट्राचे विनोद बनसोडे, जयेश सुळे, रेवन काकडे, आदित्य इंगळे, अक्षय मधुकर, स्वप्निल शिरसाट आदि पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहराची वाढती वाहतूक आणि रस्ते सुरक्षिततेच्या गरजा लक्षात घेऊन हुंदाई मोटार इंडिया फाउंडेशन यांनी सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत दिलेले हे योगदान रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हुंडाई मोटार फाउंडेशन संस्थेमार्फत आयओनिक फॉरेस्ट प्रकल्पांतर्गत एक मिलियन पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. शालेय विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी, प्रोजेक्ट अधिकार कनेक्टच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना 290 कोटी पेक्षा अधिक शासकीय योजनांचे लाभ संस्थेमार्फत मिळवून देण्यात मदत करण्यात आली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडे या 300 बॅरिकेटचे हस्तांतरण करण्यात आले आहे. आषाढी पालखी (दिंडी सोहळा) तसेच शहरातील वर्दळीचे चौक, नाकाबंदी, संवेदनशील ठिकाणे, विशेष वाहतूक नियोजन, पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी या बॅरिकेटचा प्रभावी वापर करण्यात होणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"