Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
पिंपरी-चिंचवड

सांगवी जिल्हा रुग्णालयाचे ‘सुपर स्पेशालिटी’त रूपांतर करणार ; आरोग्य मंत्री डॉ. प्रकाश आबिटकर

सांगवी जिल्हा रुग्णालयाचे ‘सुपर स्पेशालिटी’त रूपांतर करणार ; आरोग्य मंत्री डॉ. प्रकाश आबिटकर

पिंपरी : सांगवी जिल्हा रुग्णालय अधिक सक्षमपणे चालवण्यासाठी आणि या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आमदार शंकर जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन सोयी-सुविधांची पाहणी केली. आगामी काळात सांगवी जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ मध्ये केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

viara vcc
viara vcc

सांगवी जिल्हा रुग्णालयामध्ये शनिवारी डॉ. प्रकाश अबिटकर यांनी भेट दिली. यावेळी आमदार शंकर जगताप यांनी त्यांना रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा दिला. यावेळी आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, सहसंचालक डॉ.सुनिता गोलाईत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने उपस्थित होते. रुग्णालयातील आरोग्य सेवा, रुग्ण सुविधा, औषधसाठा, तसेच उपचार व्यवस्थेचा यावेळी त्यांनी सविस्तर आढावा घेतला. विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेतली तसेच आवश्यक सुधारणा व तातडीच्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

यावेळी बोलताना डॉ. आबिटकर म्हणाले, “सांगवी जिल्हा रुग्णालयात सध्या पुरेशा प्रमाणात आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध आहे. ही यंत्रसामग्री अधिक प्रभावीपणे आणि गतिमान पद्धतीने रुग्णांच्या सेवेत कशी वापरता येईल, रुग्णालयाचा दर्जा उंचावून सामान्य माणसाला खाजगी हॉस्पिटल्सच्या तोडीस तोड मोफत आणि दर्जेदार उपचार मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे. “सांगवी जिल्हा रुग्णालयात सध्या पुरेशा प्रमाणात आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध आहे. तरी देखील बाह्यरुग्ण बिभागात (ओपीडी) मधील रुग्ण संख्या कमी प्रमाणात आहे. ही रुग्णसंख्या वाढली पाहिजे. तरच लोकांचा जिल्हा रुग्णालयावरील विश्र्वास वाढेल , यासाठी सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देणे आवश्यक आहे अशी अपेक्षा आरोग्य मंत्री आबिटकर व्यक्त केली.

“या भागातील नागरिकांना किरकोळ किंवा गंभीर आजारांच्या उपचारासाठी मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांतील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागू नये, अशी आमदार जगताप यांची भूमिका आहे . सुपर स्पेशालिटी दर्जा मिळाल्यास रुग्णालयात हृदयरोग, मेंदूविकार, किडनी विकार यांसारख्या गंभीर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार होण्याचा मार्ग मोकळा होईल असे डॉ. आबिटकर यांनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"