Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

तडीपार आदेशाचा भंग ;आरोपी अटकेत!

तडीपार आदेशाचा भंग ;आरोपी अटकेत!

पिंपरी: पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांनी दोन वर्षाकरिता तडीपार केले असताना देखील या आदेशाचा भंग करून हद्दीमध्ये प्रवेश केल्याने एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवार तीन जुलै रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास धनगर बाबा मंदिराच्या समोर थेरगाव येथे करण्यात आली.

viara vcc
viara vcc

रमेश खेडकर पोलीस शिपाई, काळेवाडी पोलीस स्टेशन यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विजय राहुल तलवारे (वय 23, राम मोरया कॉलनी, माऊली चौक काळेवाडी) असे तडीपार केलेल्या अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांनी आरोपीस पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमधून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे. या तडीपार आदेशाचा भंग करून आरोपी हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलय हद्दीमध्ये दाखल झाला होता. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये कोणतेही घातक शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना देखील आरोपीने या आदेशाचा भंग करून लोखंडी कोयता जवळ बाळगल्याचा झडती मध्ये आढळून आला. काळेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"