खोट्या बुकिंग ऑर्डर दाखवून ट्रान्सपोर्ट कंपनीची फसवणूक!

पिंपरी : खोट्या बुकिंग ऑर्डर दाखवून वेळोवेळी ॲडव्हान्स स्वरूपात 65 लाख 68 लाख 68 हजार 565 रुपयांची जीजीआर ट्रान्सपोर्ट कंपनीची फसवणूक केली. ही घटना डिसेंबर 2025 पासून 12 मार्च 2026 या कालावधीत जी जी आर ट्रान्सपोर्ट ऑफिस नंबर 101/127 जय गणेश साम्राज्य दोन, सेक्टर नंबर तीन, इंद्रायणी नगर ,भोसरी येथे घडली.

या प्रकरणी अनिल हरिभाऊ ढोबळे (वय 35, रा. राजेंद्रनगर, शंकर सातपुते यांच्या रूममध्ये भाड्याने, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जयत्रीकुमारी नितेंद्र प्रसाद (रा. घर नंबर 468, सोनारी मरारपाडा समीप, सीपी क्लब कागलनगर, जमशेदपूर, झारखंड), अनिल अरुण नरळे (रा. कोकाटे यांच्या भाडेच्या खोलीत, अंकुर कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी फाटा, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींनी संगणमत करून खोट्या बुकिंग ऑर्डर दाखवून तसेच जी जीआर कंपनीचे मालक गगनसिंग विर्दी यांचे कडून वेळोवेळी ऑडव्हॉन्स स्वरूपात रक्कम घेऊन 65 लाख 68 हजार 565 रुपयांची फसवणूक केली. भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरे हे तपास करत आहेत

