Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

पत्नीशी असलेले प्रेम संबंध सोड म्हटल्याने चाकूने वार; आरोपी अटक!

पत्नीशी असलेले प्रेम संबंध सोड म्हटल्याने चाकूने वार; आरोपी अटक!

पिंपरी : पत्नीशी असलेले प्रेम संबंध सोड असे म्हटल्याने राग येऊन एका व्यक्तीच्या हातावर, बरगडीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवार दोन जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता सुमारास रोहन बिल्डर यांच्या जागेमध्ये, अशोक नगर, ताथवडे येथे घडली.

या प्रकरणी एका एक 31 वर्षीय व्यक्तीने (रा. रोहन बिल्डर यांचे जागेमध्ये, अशोक नगर, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सुरज बैच्या सरदार (वय 27, रा. रोहन बिल्डर यांचे जागेमध्ये, अशोक नगर, ताथवडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे रोहन बिल्डर यांच्या जागेमध्ये राहत असून आरोपी व फिर्यादी एकमेकांसमोर आल्यावर फिर्यादी यांनी आरोपी यास माझ्या पत्नीसोबत असलेले संबंध सोड असे म्हटल्याचा राग येऊन आरोपी याने तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणून खिशातील चाकूने फिर्यादीच्या डाव्या हातावर तसेच डावे बरगडीचे मध्यभागी चाकूने वार करून गंभीर जखमी केले. वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झिंजर्के हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस बाळगल्याने अटक!
पिंपरी : घातक शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना एका व्यक्तीने देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस जवळ बाळगल्याने पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवार 3 जुलै रोजी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास सिटीवन पन सोसायटीचे समोर, कचरा डेपो संरक्षण भिंतीलगत, राजीव कॉलनी रोड, रावेत येथे करण्यात आली.

याप्रकरणी विनायक सुभाष मराठे पोलीस शिपाई, रावेत पोलीस स्टेशन यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन पांडुरंग घवाळे (वय 31, रमाबाई नगर, रावेत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये कोणतेही घातक शस्त्र बेकायदेशीररित्या जवळ बाळगण्यास प्रतिबंध असताना आरोपी याने या आदेशाचा भंग करून 50 हजार रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक हजार रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस असे अवैधरित्या स्वतः जवळ बाळगल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले. रावेत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खिळे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"