Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
पिंपरी-चिंचवड

मोशीत साकारणार वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकास केंद्र!

मोशीत साकारणार वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकास केंद्र!

राज्य मंत्रिमंडळाची जमीन देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील १५ हेक्टर शासकीय जमीन क्रांतिवीर चापेकर समिती, क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय (चिंचवड गाव) आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रम शाळेला देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, या जागेवर मागास व वंचित आदिवासी समाजासाठी शिक्षण, संस्कार आणि सामाजिक विकासाचे सर्वांगीण केंद्र साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

viara vcc
viara vcc

क्रांतिवीर चापेकर समितीचे पद्मश्री गिरीश काका प्रभुणे यांनी या जागेची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. विधानसभा अधिवेशनादरम्यान आमदार महेश लांडगे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या जागेचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक बळ दिले. त्यानंतर शासनस्तरावर प्रक्रिया गतिमान झाली आणि अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत १५ हेक्टर शासकीय जमीन देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.

मंजूर करण्यात आलेल्या या जागेवर क्रांतिवीर चापेकर समिती, क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रम शाळेच्या माध्यमातून मागास व वंचित आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विकास केंद्र साकारले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार, कौशल्यविकास आणि सामाजिक प्रगतीच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"