Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
पिंपरी-चिंचवड

पर्यावरण विभागातील सह शहर अभियंता व कार्यकारी अभियंता पदांचा अतिरिक्त पदभार सोपविला!

पर्यावरण विभागातील सह शहर अभियंता व कार्यकारी अभियंता पदांचा अतिरिक्त पदभार सोपविला!

कार्यकारी अभियंता विनय ओहोळ,उपअभियंता पंकज धेंडे याच्याकडे पदभार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातील प्रशासकीय कामकाज सुरळीत व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सह शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता पदांचा अतिरिक्त पदभार दोन अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सदर पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविणे आवश्यक असल्याने प्रशासनाच्या वतीने याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार कार्यकारी अभियंता (स्थापत्य) विनय ओहोळ यांच्याकडे सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. उपअभियंता (स्थापत्य) पंकज धेंडे यांच्याकडे कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे यापूर्वी सोपविण्यात आलेल्या आस्थापना विभागाच्या तसेच मूळ पदाच्या कामकाजासोबत पर्यावरण विभागातील अतिरिक्त पदभाराचे कामकाजही पुढील आदेशापर्यंत सांभाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पदभाराच्या अनुषंगाने प्रदान करण्यात आलेले अधिकार संबंधित अधिकाऱ्यांनी सक्षमपणे वापरावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेच्या पर्यावरण विभागातील कामकाजात सातत्य राहावे, प्रशासकीय निर्णय व विभागीय कामांना गती मिळावी आणि नागरिकांशी संबंधित कामकाज प्रभावीपणे सुरू राहावे, या उद्देशाने ही प्रशासकीय कार्यवाही करण्यात आली आहे. प्रस्तुत आदेशाचा अंमल तात्काळ लागू करण्यात आला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"