भोसरीकरांच्या गळ्यातील ताईत : महेश लांडगे

- आमदार दिलीप मोहिते-पाटील (खेड-आळंदी विधानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस)
भोसरीकरांच्या गळ्यातील ताईत म्हणजे महेश लांडगे होय, अशा शब्दांत खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी विधानसभेतील सहकारी आमदार महेश लांडगे यांची स्तुती केली. ते म्हणाले, महेशचे आजोळ खेड तालुक्यातील गोलेगावचे. त्यांचे मामा माझ्या परिचयाचे आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करीत असताना त्यावेळचे सहकारी आमदार विलास लांडे यांचे भाचेजावई म्हणून महेशचा परिचय. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पोटनिवडणुकीत महेशला उमेदवारी द्यावी, यासाठी मी अजित पवार यांच्याकडे आग्रह धरला होता. तेव्हापासून जुळलेला स्नेह, जडलेले नाते आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आजपर्यंत कायम आहेत.

महेशची बरीच नातीगोती खेड तालुक्यात आहेत. आमच्याकडील अनेक नागरिक भोसरीमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे आम्हां दोघांमध्ये कायम संपर्क आहे, असे नमूद करून मोहिते-पाटील म्हणाले, नगरसेवकानंतर २०१४ मध्ये महेश प्रथम अपक्ष म्हणून भोसरीतून निवडून आला. त्यानंतर त्याने त्याच्या मतदारसंघात केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. अर्थात, यामध्ये त्याच्या भावांचेही तितकेच श्रेय आहे. छोटा भाऊ कार्तिक याने मध्यवर्ती कार्यालयाची धुरा सांभाळली आहे. नियोजनबद्ध कार्यक्रमांची निर्मिती आणि अंमलबजावणी यामध्ये कार्तिकचा हातखंड आहे. जवळचे मित्र परिवार आणि नातेवाईक यांच्याशी संपर्क साधण्याचे काम भैय्याने लिलया सांभाळले आहे. महेशचे वडिल नामवंत पहिलवान तर, चुलते बाळासाहेब लांडगे हे शाहू कॉलेजमध्ये आम्हांला प्राध्यापक होते. त्यामुळे कुस्तीक्षेत्रात भरीव योगदान असलेल्या या लांडगे कुटुंबियांशी दीर्घ परिचय आहे. महेश लवकर राजकारणामध्ये आला नसता तर तो नक्कीच महाराष्ट्र केसरी किंवा हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरला असता. परंतु, राजकारणात येऊन त्याने कमी वयामध्ये केलेली प्रगती नेत्रदिपक आहे. त्याने उत्तुंग यश मिळविले आहे. कर्तृत्वामुळे तो भोसरीकरांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
महेशदादांच्या व्यक्तीमत्त्वाचे विविध पैलू उलगडताना मोहिते-पाटील भरभरून बोलत होते. ते पुढे म्हणाले, धाडसाने चांगले केले आणि व्हिजन ठेवून काम केल्यास राजकारणात नेत्रदिपक प्रगती करता येते, ही बाब महेशने सिद्ध केली आहे. त्यामुळे तो भोसरीच्या राजकारणामध्ये अव्वल स्थानावर आहे. हे सातत्य टिकविल्यास पुढील कित्येक वर्षे भोसरीला त्याच्याशिवाय दुसरा आमदार शोधण्याची गरज पडणार नाही. एवढी भगगच्च विकासकामे महेशने केली आहेत.
विरोधकांचा समाचार घेताना मोहिते म्हणतात, राजकारणात विरोधक असतातच. अनेकांना राजकीय आकर्षण असते. आपणही आमदार व्हावे, असे वाटत असते. त्यामुळे ते टिका करतात. आरोप करतात. निवडणुका आल्या की चुकीच्या गोष्टींचा बाऊ केला जातो. एखादा प्रकल्प किंवा योजना पाठपुरावा करून मंजूर करण्याचे काम आमदार करतो. त्यासाठी प्रचंड मेहनत करीत असतो. प्रकल्पाची अंमलबजावणी आणि उर्वरित कामे प्रशासन करीत असते. त्याला नियम व अटी असतात. मात्र, अलीकडे बिनबुडाचे आरोप करण्याचा विरोधकांचा ट्रेंडच झाला आहे. ऊठसूट बिनदिक्कतपणे फक्त आरोपच करणे एवढेच त्यांना काम उरलेले असते. त्यांच्यात विवेकबुद्धीने मूल्यांकन करण्याचे धाडस नसते. त्यामुळे माझे महेशला एवढेच सांगणे आहे की, हाथी की चाल चलो… बाकी होतच राहील. स्वकर्तृत्वाने तो आरोपांचे अडथळे सहज पार करेल.
दादांचे स्वभावगुण वर्णन करताना मोहिते-पाटील म्हणतात, त्याचा स्वभाव अत्यंत लिन, मनमिळाऊ आहे. ज्येष्ठ कार्यकर्ता भेटल्यास पायाला वाकून नमस्कार करण्याचा नम्रपणा भावतो. आपुलकीने विचारपूस करण्याची त्याची पद्धत अनेकांना प्रिय आहे. तरुणाईसाठी तर तो सेलिब्रेटीसारखा आहे. त्याने संपूर्ण मतदारसंघात त्याने व्यक्तीमत्त्वाची अनोखी छाप पाडली आहे. जिगरबाज कार्यकर्ता, दमदार आमदार आणि दिलखुलास सहकारी आहे. त्याला माझ्या लाख-लाख शुभेच्छा आहेत.
सभागृहातील महेशची भाषणे तडाखेबंद असतात. भोसरीतील प्रश्नांवर तो तळमळीने बोलतो. भांडतो अन् ते प्रश्न सोडवतो देखील. विशेष म्हणजे, हिंदुत्वाच्या मुद्यावर महेशची आक्रमकता तीव्र होते. भविष्यात काय होईल? याची पर्वा तो करीत नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी विचाराचे सर्वच आमदार त्याची स्तुती करतात. त्याला पाठिंबा दर्शविवितात. भोसरीला न्याय मिळवून देण्याचे काम महेशने अतिशय प्रामाणिकपणे केले आहे. तो पुन्हा सभागृहात तितक्याच ताकदीने यावा, असे मोहिते-पाटील यांना मनोमन वाटते.
हे ही वाचा : महिला सुरक्षेच्या हमीसाठी हवी महेशदादांची ‘हॅट्रिक’! : many-problems-of-common-citizens-have-been-solved-by-mla-maheshdada-landge-therefore-we-stand-firmly-behind-mla-landge-and-the-women-expressed-their-belief-that-his-hat-trick-of-victory-is-a-white-l
व्होट हिंदुत्व’ पुढे नेण्यासाठी महेश लांडगे यांचा विजय गरजेचा : मिलिंद एकबोटे : mahesh-landges-victory-is-necessary-to-take-vote-hindutva-forward-milind-ekbote