फक्त मुद्द्याचं!

20th June 2026
गुन्हेगारी

मोबाईलची खरेदी रक्कम पाठविल्याचे भासवून फसवणूक!

मोबाईलची खरेदी रक्कम पाठविल्याचे भासवून फसवणूक!

पिंपरी : आयफोन 17 प्रो मोबाइल खरेदी करण्याचा बहाणा करून मोबाईलची खरेदी रक्कम मोबाईल ॲप वरून पाठवतो असे म्हणून फिर्यादीचे बँक अकाउंट वर 1 लाख 50 हजार रुपये पाठविल्याचे भासवून फसवणूक केली. ही घटना 16 जून रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वराळे गावचे हद्दीत, विजय शेलवान मोबाईल शॉपी, ता. मावळ येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी सुरेश एकनाथ गोपाळे (वय 41, रा. वराळे, घर नंबर 523, रूडसेट इन्स्टिट्यूट जवळ, ता. मावळ यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती (अंदाजे वय 22 ते 24 ) विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या विजय शेलवान मोबाईल शॉपी मध्ये अनोळखी युवक (अंदाजे वय 22 ते 24 )याने आयफोन 17 प्रो मोबाइल खरेदी करण्याचा बहाणा करून मोबाईलची खरेदीची रक्कम एक लाख 35 हजार रुपये मोबाईल ॲप वरून पाठवतो असे म्हणून फिर्यादीचे बँक अकाउंट वर 1 लाख 50 हजार रुपये पाठवल्याचा स्क्रीन शॉट फिर्यादीस दाखवून व फिर्यादीचे मोबाईलवर स्क्रीन शॉटचा फोटो पाठवून रक्कम पाठवल्याचे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. मोबाईल खरेदीची रक्कम न देता फिर्यादीची फसवणूक केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे शेख हे तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"