फक्त मुद्द्याचं!

20th June 2026
गुन्हेगारी

अतिक्रमण हटवण्याची कारवाई, कर्मचाऱ्याला मारहाण; गुन्हा दाखल!

अतिक्रमण हटवण्याची कारवाई, कर्मचाऱ्याला मारहाण; गुन्हा दाखल!

पिंपरी : अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार 18 जून रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी साहिल मंगेश दाभाडे (वय 22, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश दिलीप जगदाळे (वय 35, हॉचींग शाळेजवळ, तळेगाव दाभाडे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात कार्यरत असून ते सहकाऱ्यांसह हातगाड्यांवर कारवाई करीत होते .त्यावेळी आरोपीने तेथे येऊन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच दमदाटी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

viara vcc
viara vcc

विनापरवाना पिस्तूल बाळगणारा अटकेत
पिंपरी : गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवार 18 जून रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी बाळासाहेब विधाते पोलीस शिपाई, यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इम्रान रमजान रंगरेज (वय 28, रा. देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संशयास्पदरित्या थांबलेला असताना त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे 50 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"