फक्त मुद्द्याचं!

20th June 2026
पुणे

पुणे ग्रँड टूर २०२६ : यशस्वी आयोजनाबद्दल ‘पीएमआरडीए’चा सन्मान!

पुणे ग्रँड टूर २०२६ : यशस्वी आयोजनाबद्दल ‘पीएमआरडीए’चा  सन्मान!

पुणे : भारतातील पहिल्या ‘यूसीआय क्लास २.२’ दर्जाच्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड टूर २०२६’च्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिल्याबद्दल पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) राज्य सरकारतर्फे विशेष सन्मान करण्यात आला.

viara vcc
viara vcc

मुख्यमंत्री तथा ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या स्पर्धेसाठी ‘पीएमआरडीए’ने आर्थिक सहकार्य केले होते. त्याअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे ४५० किलोमीटरचा आव्हानात्मक मार्ग आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विक्रमी वेळेत विकसित करण्यात आला. या कामात पीएमआरडीएने पायाभूत सुविधांची उभारणी आणि अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ‘पीएमआरडीए’चे प्रभारी मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी यांनी प्रशस्तिपत्र स्वीकारले. यावेळी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले आणि जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी उपस्थित होते.

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेसाठी आवश्यक निधीही तातडीने उपलब्ध करून देण्यात आला. या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राज्य सरकारने ‘पीएमआरडीए’ला विशेष सन्मान प्रदान केला. यावेळी बोलताना पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘‘४५० किलोमीटरच्या मार्गाचे आंतरराष्ट्रीय रेसिंग मानकांनुसार विक्रमी वेळेत रूपांतर करणे ही अभियांत्रिकी कौशल्याची उत्कृष्ट कामगिरी आहे. वित्तीय आणि प्रशासकीय समन्वयासह प्रभावी अंमलबजावणीमुळे जागतिक दर्जाचा, सुरक्षित आणि स्पर्धेसाठी सक्षम मार्ग निर्माण करणे शक्य झाले.’’

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"