अंमली पदार्थ गांजा विक्री प्रकरणी; दोघे अटकेत!

चाकण : बेकायदेशीररित्या 18 हजार 100 रुपये किंमतीचा अंमली पदार्थ गांजा विक्रीकरिता जवळ बाळगल्याने दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून चार जण फरार आहेत. ही घटना शुक्रवार 19 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चाकण, पुणे- नाशिक रोड पासून घाडगे मळ्यात जाणाऱ्या रोडच्या कडेला ,ता. खेड येथे घडली.

याप्रकरणी बाळू मराठे पोलिस अंमलदार चाकण उत्तर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दाखल केली आहे. आली साजिद सिकीलकर (वय 20, रा. माळी, चाकण, ता. खेड ),संतोष कुमार मोहनलाल विश्वकर्मा (वय 26, रजत हॉटेलच्या चालू बांधकामाच्या ठिकाणी धाडगे मळा, चाकण, ता. खेड, मूळ पत्ता- जमखोरी, ता. सुराव, मऊआयमा, जि. इलाहाबाद, उत्तर प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत .पाहिजे असलेल्या आरोपींमध्ये निखिल उर्फ दाद्या कांबळे (रा. चाकण), सलमान इनामदार चाकण संकेत कौटकर, प्रवीण जाधव उर्फ बॉस यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांच्या ताब्यात बेकायदेशीररित्या विक्रीसाठी 18 हजार 100 रुपये किंमतीचा एकूण 358 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळून आला. पोलिसांनी एक मोटरसायकल जप्त केली. चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक नरवडे हे तपास करत आहेत.
रस्ता ओलांडताना टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू!
चाकण : पायी रस्ता ओलांडत असताना एका तरुणाला टेम्पो ने धडक दिल्याने गंभीर जखमी केले. उपचारापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 18 जून रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास महाळुंगे गावचे कमानीजवळ, ता. खेड येथे घडली.
याप्रकरणी रश्मी अशोक गौड (वय 22, रा. किरण पवार यांच्या भाड्याच्या खोलीत, महाळुंगे ता. खेड मूळ राहणार – बरबटाता, जि. दमोह, उत्तर प्रदेश) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दीपक रामभाऊ राठोड रा. कोठा, ता. जिंतूर ,जि. परभणी) असे आयशर टेम्पो चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे पती अशोक परशु गौड (वय 25 )हे पायी रस्ता ओलांडत असताना तळेगाव बाजू कडून चाकण बाजूकडे भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पो क्रमांक (एम एच 20/ इ एल/ 26 19) ने अशोक गौड यास जोरदार धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुल्ला हे तपास करत आहेत.

