महिला सुरक्षेच्या हमीसाठी हवी महेशदादांची ‘हॅट्रिक’!

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक समस्या आमदार महेशदादा लांडगे यांनी सोडविल्या आहेत. अनेक समस्यांचा सातत्याने पाठपुरावा करून आम्हाला न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे आम्ही आमदार लांडगे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांची विजयाची हॅट्ट्रिक होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा विश्वास महिलांनी व्यक्त केला.
इंद्रायणीनगर परिसरातील सर्व सेक्टरमधील मालमतांची मालकी पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) होती. या सर्व मालमत्ता फ्री होल्ड करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी मोठा पाठपुरावा केला. अधिवेशनात लक्षवेधी मांडली आणि मालमत्ता फ्री होल्ड करून घेतल्या. त्याबाबतचा शासन निर्णय देखील आणला. आम्ही स्वतःच्या घराचे मालक झालो, म्हणून तिसऱ्यांना महेशदादा विधानसभेवर निवडून आले पाहिजेत, असे मत महिला मतदारांनी व्यक्त केले. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.
या परिसरात सेक्टर क्रमांक १३ पासून गाठीभेटींना सुरुवात झाली. राजमाता जिजाऊ, सारा, स्पाईन चौकात आमदार लांडगे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. सेक्टर ११, ९, ६, ४, ३, ७, २, आणि १ या परिसरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या. महिलांनी आमदार लांडगे यांचे औक्षण केले. महिला, युवक, युवती, जेष्ठ सर्वांनी मोठ्या उत्साहाने आमदार लांडगे यांचे स्वागत केले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, प्रतापमामा मोहिते, योगेश लांडगे, शिवराज लांडगे, योगेश लोंढे, हनुमंत लांडगे, निखिल काळकुटे, कुंदन काळे, पंकज पवार, बाबुराव लोंढे यांच्यासह ग्रामस्थ महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विकासकामांच्या जोरावर विजयाची खात्री
जिल्हा न्यायालय, पोलीस आयुक्तालय प्रभागाच्या लगत होत आहे. उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय प्रभागातच आहे. देशातील पहिले संविधान भवन सेक्टर ११ मध्ये साकारत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग मैदान आमदार लांडगे यांच्या प्रयत्नातून विकसित झाले. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र या भागातच आहे. विविध शासकीय कार्यालयामुळे हा भाग शहराचा मुख्य परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. महिलांच्या सुरक्षिततेची काळजी आमदार महेश लांडगे घेतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून महेश लांडगे यांची विजयाची हॅट्ट्रिक ही होणार हे निश्चित आहे.
फ्री होल्डच्या निर्णयामुळे मिळकतधारकांना दिलासा…
प्राधिकरण मालमत्ता फ्री होल्ड करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. फ्री होल्ड करण्यासाठी एकाही पुढाऱ्याने पुढाकार घेतला नाही. आमदार महेश लांडगे यांनी यात लक्ष घातले, सातत्याने पाठपुरावा केला. विधानसभेच्या सभागृहात आक्रमकपणे हा प्रश्न मांडला आणि सरकारला मालमत्ता फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले. पाठपुरावा करून शासन निर्णयही आणला.त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.