फक्त मुद्द्याचं!

13th May 2026
गुन्हेगारी

चुलत भावाने केली 1 लाख 29 हजार रुपयांची चोरी!

चुलत भावाने केली 1 लाख 29 हजार रुपयांची चोरी!

पिंपरी : पाहुणा म्हणून आलेल्या चुलत भावाने आपला भाऊ आणि वहिनी कामावर गेले असताना त्यांच्या लोखंडी कपाटाच्या लॉकर मधून 1 लाख 29 हजार पाचशे रुपये किंमतीचे सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरली. ही घटना सोमवार ११ मे रोजी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान राहते घरी हेमा दाभाडे यांची खोली, नम्रता साकार सोसायटीच्या बाजूला, मनोहर नगर तळेगाव दाभाडे, ता. मावळ येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी सुरज विजयकुमार गायकवाड (वय 37, हेमा दाभाडे यांची खोली नम्रता साकार, सोसायटीच्या बाजूला मनोहर नगर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उत्तम गायकवाड (वय 40, मोरखंडी, ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व फिर्यादी यांची पत्नी कामावर गेले असताना फिर्यादी यांच्या घरी आलेला त्यांचा चुलत भाऊ उत्तम गायकवाड (वय 40) याने फिर्यादीच्या राहत्या घराचे बेडरूम मधील उघड्या लोखंडी कपाटाच्या लॉकर मधून 1 लाख 29 हजार पाचशे रुपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने चोरी केली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे कळसाईत हे तपास करत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"