मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा पुढील ४८ तास उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाखाली राहणार!

पुणे : राज्यात पुढील ४ दिवस बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे . १२ आणि १३ मे रोजी नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, संभाजीनगर, जालना तसेच पुण्यातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. १४ आणि १५ मे रोजी नागपूर, अकोला आणि अमरावती येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुरेसे पाणी व फळांचे रस प्या. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत बाहेर जाणे टाळा. उष्माघात किंवा ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. सुरक्षित राहा.

महाराष्ट्रात उष्णतेची लाट वाढण्यामागे तीन प्रमुख कारणे
उत्तर भारतातून येणारे कोरडे आणि गरम वारे राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशकडून कोरडे गरम वारे महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान झपाट्याने वाढले आहे. पुण्यातही याच कारणामुळे विक्रमी उष्णता नोंदली गेली. ढग नसल्यामुळे सूर्यकिरण थेट जमिनीवर पडत आहेत. त्यामुळे दुपारी तापमान अधिक वेगाने वाढत आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department ) पुढील 2-4 दिवस तापमानात आणखी वाढ होईल असे सांगितले आहे.
प्री-मान्सून वाऱ्यांचा कमकुवत प्रभाव
साधारण मे महिन्यात काही भागात मेघगर्जना किंवा अवकाळी पाऊस होतो, पण सध्या तो प्रभाव कमी असल्यामुळे उष्णता अडकून राहिली आहे.
सध्या सर्वाधिक तापमान कुठे?
अकोला – 45.1°C ,अमरावती – 44°C ,वर्धा – 43.8°C , छत्रपती संभाजीनगर – 43.4°C ,पुणे – लोहगाव 43.8°C, शिवाजीनगर 41.6°C , नाशीक – 42°C, जळगाव – 44°C+
पुढील 2 दिवसांचा अंदाज (12–13 मे) विदर्भ सर्वाधिक उष्ण भाग राहण्याची शक्यता:
अकोला – 44 ते 46°C ,अमरावती – 43 ते 45°C ,नागपुर – 42 ते 44°C ,वर्धा – 43 ते 45°C ,चंद्रपुर – 42 ते 44°C
भारतीय हवामान विभागानुसार 14-15 मे ला विदर्भात उष्णता आणखी तीव्र होऊ शकते.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर – 43 ते 44°C ,जालना – 42 ते 44°C ,बीड – 41 ते 43°C ,परभणी – 42 ते 43°C ,लातूर – 40 ते 42°C
12 आणि 13 मे ला भारतीय हवामान विभागानुसार उष्णतेचा इशारा दिला आहे
उत्तर महाराष्ट्र
जळगाव – 43 ते 45°C
धुळे– 42 ते 44°C
नंदुरबार – 41 ते 43°C
नाशीक – 41 ते 43°C
या जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे – 41 ते 43°C , सोलापुर – 40 ते 42°C , सातारा – 38 ते 41°C ,सांगली – 39 ते 42°C ,कोल्हापुर – 37 ते 39°C
कोकण
मंबई – 34 ते 37°C , ठाणे – 35 ते 37°C, रायगड – 34 ते 36°C ,रत्नागिरी – 33 ते 35°C
इथे तापमान तुलनेने कमी असले तरी humidity जास्त असल्याने उकाडा अधिक जाणवेल.
कधी दिलासा मिळेल?
14–15 मे नंतर काही भागात प्री-मान्सून ढग आणि वाऱ्यामुळे तापमान 1-2°C ने कमी होण्याची शक्यता आहे. पण विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेचा प्रभाव अजून काही दिवस कायम राहू शकतो.

