श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात प्रस्थान !

देहूमध्ये वारकऱ्यांची मांदीयाळी
देहू : वारकग्यानबा तुकाराम च्या जयघोशात आज दुपारी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले .राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले .हा नयनरम्य सोहळा हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या निनादात संपन्न झाला .
आषाढी वारीचे आणि पांडुरंगाची ओढ वारकऱ्यांना लागलेली असते . यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्याने शेतकरी आनंदात आहेत .गेल्या वर्षभरापासून वारकरी पालखी सोहळ्याच्या प्रस्थानच्या वाटेकडे लक्ष देऊन असतात आज दुपारी वरुणराजाच्या उपस्थितीत पालखीचे प्रस्थान झाले .त्यावेळी सभामंडपात वारकऱ्यांनी ज्ञानबा तुकाराम यांच्या जयघोषाने सभामंडप दुमदुमून सोडला.
यंदाचा 340 वा पालखी सोहळा असून प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ,खासदार सुनेत्रा पवार .खासदार श्रीरंग बारणे , आमदार महेश दादा लांडगे , आमदार सुनील शेळके आमदार अमित गोरखे , आमदार उमा खापरे , आमदार शंकर मांडेकर , विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार ,जिल्हाधिकारी जितेंद्र उडी ,श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह भ प जालिंदर मोरे ,पालखी सोहळा प्रमुख हभप गणेश महाराज मोरे , ह भ प वैभव महाराज मोरे , ह भ प दिलीप महाराज मोरे विश्वस्त , ह भ प विक्रम सिंह मोरे ,हभप उमेश महाराज मोरे , ह भ प लक्ष्मण महाराज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळी भजनी मंडपात प्रस्थानापूर्वी देहूकर महाराजांचे काल्याचे किर्तन झाले. दुपारी अडीच वाजता तुकोबा महाराजांच्या पादुकांचे पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले .त्यानंतर पालखीचे प्रस्थान ठेवण्यात आले यंदा मंदिरातच्या कळसाला फुलांची सजावट करण्यात आली आहे .याशिवाय सुरक्षा म्हणून मंदिरात 42 व मंदिरा बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत .श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने प्रस्तानाची उत्तम तयारी करण्यात आली होती . श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचा संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थांच्या विश्वस्तांची चर्चा केली. महापूजेनंतर पालखीने भक्तिमय वातावरणात इनामदार वाड्यांकडे मुक्कामासाठी प्रस्थान ठेवले .