फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

ग्रीन सोसायटी उपक्रमांतर्गत महापालिका करणार पर्यावरणपूरक सोसायट्यांचा सन्मान!

ग्रीन सोसायटी उपक्रमांतर्गत महापालिका करणार पर्यावरणपूरक सोसायट्यांचा सन्मान!

कचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा, पावसाचे पाणी संकलन अशा विविध निकषांवर होणार सोसायट्यांचे मूल्यमापन
पिंपरी : पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या गृह प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘ग्रीन सोसायटी’ हा उपक्रम सुरू केला आहे. स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश असून, हे पाऊल पर्यावरणस्नेही परिसर आणि जबाबदार नागरी जीवनशैली निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत सोसायट्यांचे मूल्यांकन करण्यासाठी काही प्रमुख निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे, सोसायटीमध्ये सेंद्रिय कचऱ्याचे कंपोस्टिंग करणे, सौरऊर्जेचा वापर करणे, पावसाचे पाणी साठवणे (रेन वॉटर हार्व्हेस्टिंग), आणि सांडपाण्याची शुद्धीकरण व पुनर्वापर यंत्रणा बसविणे. प्रत्येक निकष पूर्ण केल्यावर सोसायटीला एक ‘ग्रीन स्टार’ दिला जाईल. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मान महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते विशेष कार्यक्रमात केला जाईल.

viarasmall
viarasmall

आयुक्त शेखर सिंह या उपक्रमाबद्दल बोलताना म्हणाले, हा उपक्रम म्हणजे नागरिकांना ‘ग्रीन अ‍ॅम्बेसेडर’ बनवण्याची संधी आहे. प्रत्येक सोसायटीकडे त्यांच्या पर्यावरणीय परिणामात लक्षणीय फरक घडवून आणण्याची क्षमता आहे. ग्रीन स्टार रेटिंगद्वारे महापालिका शहरातील वातावरण पर्यावरण पूरक ठेवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सोसायट्यांचा गौरव करणार आहे.आणि यामुळे निश्चितच इतरांना प्रेरणा मिळणार आहे. तसेच महापालिकेकडून हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. सर्वप्रथम जनजागृती सत्रे घेतली जातील, त्यानंतर नोंदणी प्रक्रिया, प्रशिक्षण सत्रे आणि प्रत्यक्ष सोसायटींचे मूल्यांकन करण्यात येईल.

ग्रीन सोसायटी या उपक्रमाचे नेतृत्व आरोग्य विभागाचे उपआयुक्त सचिन पवार करत आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, ग्रीन सोसायटी या उपक्रमामुळे फक्त इच्छाशक्ती नव्हे तर कृती घडवून आणणारी दिशा गृहप्रकल्पांना यामुळे मिळणार आहे. शिवाय, पिंपरी चिंचवडकरांना शाश्वत शहर जीवनशैलीकडे वाटचाल करण्यासाठी देखील यामुळे प्रोत्साहन मिळेल असा विश्वास आहे. ‘ग्रीन सोसायटी उपक्रम’ ही केवळ शासकीय योजना नसून, लोकांच्या सहभागातून पर्यावरण जागरूकतेची संस्कृती निर्माण करण्याची चळवळ ठरणार आहे.

कशी असायला हवी एकग्रीन सोसायटी

  • कचरा वर्गीकरण: ओला आणि सुका कचरा स्रोताजवळच वेगळा करणे.
  • घरगुती कंपोस्टिंग: सेंद्रिय कचऱ्याचे सोसायटीमध्येच व्यवस्थापन करणे.
  • सौरऊर्जा वापर: सार्वजनिक भागांतील वीज गरजांसाठी सौर पॅनेलचा वापर करणे.
  • पावसाचे पाणी साठवण (रेनवॉटर हार्वेस्टिंग): पावसाचे पाणी संकलित करून वापरणे.
  • सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर: सांडपाण्यावर प्रक्रिया करून बागकाम व अन्य उपयोगांसाठी वापरणे.
    उपक्रमाची कार्यपद्धती:
  • प्रत्येक निकष पूर्ण केल्यावर त्या सोसायटीला एक ग्रीन स्टार दिला जाईल.
  • सर्व निकष पूर्ण करणाऱ्या सोसायट्यांना महापालिकेकडून विशेष सन्मान प्रदान करण्यात येईल.
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"