Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

14th September 2026
गुन्हेगारी

दारू पिताना झालेल्या वादात तरुणाचा खून ; एकास अटक

दारू पिताना झालेल्या वादात तरुणाचा खून ; एकास अटक

पिंपरी : दारू पिताना झालेल्या वादात एका तरुणाचा निर्घुण खून करण्यात आला. या खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी डोक्यात वार करून, हात, पाय व कंबर वायरने बांधल्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला. हा प्रकार 22 जुलै रोजी मुळशी तालुक्यातील नेरे येथील मेमाणे वस्तीत उघडकीस आला. सुमन पात्रा (मूळ- रा. सिमुलतला ,नाडिया ,पश्चिम बंगाल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

रामदास पांडुरंग मेमाणे (वय 63, नेरे, ता, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतु उर्फ विशाल वासुदेव मांजी (वय 22, चूर्णीपोत ,जि. नादिया, पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार नेरे येथील बांधकाम साइटवर राहणारा सुमन पात्रा आणि आरोपी मांजा हे एकत्र दारू पीत असताना त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने सुमनच्या डोक्यात तसेच कपाळावर मारहाण केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे हात पाय व कंबर वायरने बांधून विहिरीत फेकून त्याचा खून केला. हिंजवडी पोलीस पोलीस तपास करत आहेत.

बालमजुरी प्रकरणी बेकरी चालकावर गुन्हा!
पिंपरी : बेकरीमध्ये बालमजुराकडून काम करून घेत त्याला पगार न देता मारहाण केल्याप्रकरणी बेकरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार केशवनगर, चिंचवड येथे उघडकीस आला.

याप्रकरणी समशेर झाकीर अन्सारी (वय 40, राम कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुनील आंब्रे यांनी फिर्याद दिली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"