Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
गुन्हेगारी

ट्रॅव्हल्स ऑफिस मध्ये घुसून तोडफोड; 50 हजार रुपये हप्त्याची मागणी!

ट्रॅव्हल्स ऑफिस मध्ये घुसून तोडफोड; 50 हजार रुपये हप्त्याची मागणी!

पिंपरी : ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये घुसून तोडफोड करीत दरमहा 50 हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी करून हप्ता न दिल्यास ऑफिस चालू देणार नसल्याची धमकी देण्यात आली. ही घटना सोमवार 24 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वाकड भुजबळ चौकात घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी कार्तिक हनुमंत बारवे (वय 23 ,रा .वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास काळे (वय 28,रा.वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बारावे यांच्या डॉल्फिन ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून ऑफिस मधील दोन संगणक, प्रिंटर, वायफाय मशीन, कॅमेरा, डिव्हाईस आणि फिर्यादीच्या हातातील दोन मोबाईल फोन फोडले. टेबल आणि फ्लोअरची तोडफोड केली. मला दरमहा 50 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. अन्यथा इथे ऑफिस चालू देणार नाही अशी धमकी देऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"