Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
गुन्हेगारी

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 32 सराईत गुन्हेगारांवर कारवाई!

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 32 सराईत गुन्हेगारांवर कारवाई!

पिंपरी : आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सांगवी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. 32 सराईत गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीची कारवाई करण्यात आली.

viara vcc
viara vcc

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) तीन टोळ्यातील एकूण 23 सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. हे आरोपी सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. दोन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यापैकी एकाला छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल मध्यवर्ती कारागृहात तर दुसऱ्याला कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. सात सराईत गुन्हेगारांना परिसरातून तडीपार करण्यात आले आहे.

ही कारवाई सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस हवालदार विनोद साळवे, सचिन तुपे, पोलिस अंमलदार प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"