फक्त मुद्द्याचं!

28th April 2026
पिंपरी-चिंचवड

निगडीतील हाय टेन्शन टॉवरवर चढलेल्या व्यक्तीचा थरारक बचाव!

निगडीतील हाय टेन्शन टॉवरवर चढलेल्या व्यक्तीचा थरारक बचाव!

अग्निशमन दलाची धाडसी कामगिरी
पिंपरी : निगडीतील चिकन चौक, यमुना नगर परिसरात सोमवारी रात्री अति उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवरवर एका इसमाने चढून धोकादायक परिस्थिती निर्माण केल्याची घटना घडली. रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या प्राधिकरण उप अग्निशमन केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान संबंधित इसम टॉवरच्या शिखरावर उभा राहून तारेवर कसरत करत असल्याचे दिसून आले,त्यामुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण झाला होता.

viara vcc
viara vcc

उप आयुक्त तथा मुख्य अग्निशमन अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तातडीने ५५ मीटर उंचीची ब्रांटो स्काय लिफ्ट मागवून बचावकार्य सुरू केले. रेस्क्यूदरम्यान संबंधित इसमाने टॉवरवरील अर्थिंग वायरचा जॉइंट खाली फेकण्याचा प्रयत्न केला; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत धाडस आणि कौशल्य दाखवत बचावकार्य केले. प्रारंभी चालक आणि यंत्रचालक दीपक ढवळे यांनी टॉवरखाली जंपिंग शीट व ताडपत्री लावून आवश्यक सुरक्षेची उपाययोजना केली. त्यानंतर लिडिंग फायरमन विकास नाईक यांनी टॉवरवर चढून इसमाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तर फायरमन सचिन ठोसरे यांनी त्यांना सहकार्य केले.

यानंतर सह अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले आणि अनिल माने यांनीही टॉवरवर चढून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली. दुसऱ्या बाजूने ब्रांटो स्काय लिफ्टच्या सहाय्याने ऋषिकांत चिपाडे, अमोल चिपळूणकर आणि नाथा शिंदे यांनी बचावकार्य सुरू ठेवले. ब्रांटो ऑपरेशन अमोल चिपळूणकर आणि रुपेश जाधव यांनी यशस्वीरीत्या हाताळले.

अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी संबंधित इसमाला सुरक्षितपणे पकडून ब्रांटो केजमध्ये घेतले आणि सुखरूप खाली आणले. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या बचावकार्यात अग्निशमन दलासोबत पोलीस, महावितरण अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनीही मोलाचे सहकार्य केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"