पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सात पोलीस अधिकारी अंमलदार सेवानिवृत्त!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीतील सात पोलीस अधिकारी व अंमलदार तीस जून 2026 रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचा सेवानिवृत्ती निमित्त स्मृतीचिन्ह भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त अधिकारी आणि अंमलदारांचा सन्मान पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहायुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्रीरंग आवाड, पोलीस उपायुक्त गणेश इंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व अंमलदारांमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश नांदुरकर, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक साळुंके, पोलीस निरीक्षक शंकर डामसे ,श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शांताराम उभे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रामदास नरवडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उमेश जोशी, पोलीस हवालदार राजू केदारी यांचा त्यांच्या कुटुंबीयांसह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतीचिन्ह, झाडाचे रोपटे व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरावाड (कल्याण शाखा), सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे व अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

