Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत हातभट्टी दारू विक्रीच्या घटना सुरुच!

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत हातभट्टी दारू विक्रीच्या घटना सुरुच!

पिंपरी : मागील महिन्यात विषारी हातभट्टी दारूमुळे सुमारे 27 जणांचा बळी गेला असताना देखील अजूनही शहराच्या काही भागात हातभट्टी दारूची विक्री आणि उत्पादन सुरू असल्याचे आढळून येत आहे. दारूबंदी पथक गुन्हे शाखेचे लक्ष्मीकांत उद्धवराव पतंगे यांनी सुदूबंरे, ता. मावळ ,तळेगाव दाभाडे रोडच्या कडेला मोकळ्या जागेत सोमवार 29 जून रोजी 70 लिटर हातभट्टी दारू विक्रीसाठी वाहतूक करताना पकडण्यात आली.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजदलक सिंग रजपूत (वय 23, हनुमानवाडी, वाकी बुद्रुक, ता. खेड )या आरोपीस अटक करण्यात आली आहे. या आरोपीने प्रदीप गुडदावन (रा. गाडामोडीचा, यवत) याने ही हातभट्टीची दारू आरोपी क्रमांक एक याला (एम एच 14/ सी एस/ 66 56 )या गाडीतून पुरवली आहे. यातील आरोपी क्रमांक एक याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 700 रुपये किंमतीची 70 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार चौधरी हे तपास करीत आहेत.

बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्री प्रकरणी एकासअटक!
पिंपरी : अवैधरित्या गावठी हातभट्टी दारूची विक्री करीत असताना व हातभट्टी तयार दारू प्रोव्हीचा मुद्देमाल बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवार 30 जून रोजी साडे तीन वाजण्याच्या सुमारास गोणवाडी गावच्या हद्दीत ,स्मशानभूमी जवळ ,ता. खेड येथील मोकळ्या जागेत करण्यात आली.

याप्रकरणी मंगेश देवराम कदम उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दाखल केली आहे. जीवन मारुती राजपूत (वय 48, रा गोणवडी, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने 1700 रुपये किंमतीचा 17 लिटर गावठी हातभट्टी दारू अवैधरित्या विक्री करीत असताना मिळून आला. याशिवाय हातभट्टी तयार दारू प्रोव्हीचा मुद्देमाल बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवल्याने कारवाई करण्यात आली. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे होले हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"