फक्त मुद्द्याचं!

21st April 2026
गुन्हेगारी

ज्येष्ठ नागरिक असलेल्या वडिलांनी सायबर फसवणुकीपासून वाचविले!

ज्येष्ठ नागरिक असलेल्या वडिलांनी सायबर फसवणुकीपासून वाचविले!

पिंपरी : मुंबई पोलीस क्राईम ब्रँच मधून बोलत असल्याचे सांगून निगडी येथील तरुणाला तुमचे पार्सल पकडण्यात आले असून त्यामध्ये वेगवेगळे पाच पासपोर्ट व एमडी ड्रग्स मिळून आले आहेत. त्यामुळे तुम्हाला डिजिटल अरेस्ट केले असल्याचे सांगितले. अटक टाळण्यासाठी बँक खात्यातून पैसे पाठवण्यास सांगितले. परंतु त्या तरुणाने आपल्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या वडिलांना ही माहिती सांगून सायबर फसवणुकीपासून वाचविले अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.

vcc aksyay trutiya
vcc aksyay trutiya

डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार 19 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ते 20 एप्रिल 2026 रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत सिग्नल नावाचे ॲप द्वारे व्हिडिओ कॉल करून पीडित तरुणाला सांगण्यात आले की, तुमच्या पार्सलमध्ये पाच वेगवेगळे पासपोर्ट आणि एमडी ड्रग्स मिळून आले आहे. आणि आम्ही मुंबई क्राईम ब्रँच मधून बोलत असून तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर चौकशीला सामोरे जावे लागेल. तोपर्यंत ऑनलाईन व्हिडिओ कॉल सुरू ठेवण्यास सांगितले .थोड्यावेळाने पोलीस गणवेशातील बनावट अधिकाऱ्याने चौकशी करून पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्यात येईल असे सांगितले. हा प्रकार कोणालाही सांगू नका अशी धमकी देऊन तुम्ही पती-पत्नी दोघे डिजिटल अरेस्ट असल्याचे सांगितले .

पीडित तरुणांकडून बँक खात्याची माहिती घेतली आणि बँक अकाउंट वर पैसे पाठवण्यासाठी सांगितले. पीडित तरुणाने व्हिडिओ कॉल फोन बाजूला ठेवून वडील ज्येष्ठ नागरिक (वय 81) यांना ही माहिती सांगितली. त्यांनी लगेच सायबर पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड येथील पोलिस अंमलदार सोपान बोधवड यांना संपर्क साधून माहिती दिली. बोधवड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली. पोलिस अंमलदार बोधवड, मुकुंद वारे व निगडी पोलीस ठाणे कडील महिला पोलीस अंमलदार स्नेहा मस्के हे तात्काळ पीडित तरुण यांच्या घरी जाऊन त्यांना सदरचा प्रकार डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा असल्याचे सांगितले. त्यामुळे पीडित तरुणाला फसवणुकीपासून वाचविले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी जेष्ठ नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसवणुकीचा प्रकार टळला असे सांगून आभार मानले. नागरिकांना आवाहन केले आहे की, डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही. कोणताही पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क साधून डिजिटल आरेस्ट करीत नाही. यासाठी सायबर पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड किंवा डायल 112 यावरून सायबर पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"