फक्त मुद्द्याचं!

19th April 2026
पुणे

लोणीकंदमध्ये अनधिकृत होर्डिंगवर ‘पीएमआरडीए’चा हातोडा!

लोणीकंदमध्ये अनधिकृत होर्डिंगवर ‘पीएमआरडीए’चा हातोडा!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिक्रमण निर्मूलन विभागाने अनधिकृत होर्डिंगविरुद्ध कारवाईचा धडाका लावला आहे. हवेली तालुक्यातील लोणीकंद येथे शुक्रवारी (ता. १७) अनधिकृतपणे उभारलेले महाकाय होर्डिंग प्रशासनाने जमीनदोस्त केले.

viara vcc
viara vcc

लोणीकंद येथील गट क्रमांक ४१ मध्ये कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय एक मोठे होर्डिंग उभारण्यात आले होते. या अनधिकृत बांधकामावर ‘पीएमआरडीए’ने कारवाईचा बडगा उगारला. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रभारी सहआयुक्त हिंमत खराडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार रवींद्र रांजणे आणि तहसीलदार आशा होळकर यांच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन हे होर्डिंग हटवले.

“पीएमआरडीए हद्दीतील वाढते नागरीकरण पाहता, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने होर्डिंगला कायदेशीर परवानगी असणे अनिवार्य आहे. ज्या होर्डिंगधारकांनी अद्याप परवानगी घेतलेली नाही, त्यांनी ती तातडीने घ्यावी. अन्यथा, यापुढील काळात अशा सर्व अनधिकृत होर्डिंगवर अधिक तीव्र स्वरूपाची कारवाई केली जाईल,” असा इशारा हिंमत खराडे यांनी दिला आहे.

पुणे महानगर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’ने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळातही ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे ‘पीएमआरडीए’ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"